
दरमहा 50000 रुपये; अमित शहा यांची मोठी घोषणा…
2036 ऑलिम्पिकसाठी भारताची जोरदार तयारी : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताच्या संघाने सहा पदक नावावर केले होते. भारताचे शंभरहून अधिक खेळाडू हे पारस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते. पण भारताचा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या गटामध्ये अनेक खेळाडू हे चौथ्या स्थानावर राहिले त्यामुळे त्यांचे पदक हुकले होते.
पुढील ऑलिम्पिक स्पर्धा ही 2018 मध्ये आयोजित केली जाणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धा लॉस एंजल्स अमेरिकेमध्ये आयोजित केली जाणार आहे.
भारताने मागील काही वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रांमध्ये अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाला मोठ्या स्तरावर नेले आहे. यामध्ये नीरज चोप्रा, पीव्ही सिंधू, सायना नेहवाल त्यांसारख्या खेळाडूंचा मोलाचा वाटा आहे. भारतीय क्रीडा क्षेत्राने आता मोठे पाऊल उचलण्याचा ठरवले आहे. भारतीय सरकारने भारताच्या 3000 खेळाडूंना 2036 मध्ये होणारा ऑलिम्पिकसाठी प्रत्येक महिना 50 हजार रुपये देण्याची घोषणा भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट सांगितले आहे.
नवी दिल्लीमध्ये एकविसाव्या जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अमित शहा यांचा आणि भारतीय पथकांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर त्यांनी विविध गटामधील मुलांना प्रत्येक खेळामध्ये शास्त्रीय पद्धतीने निवडले जात आहे आणि त्यांना प्रशिक्षण देखील दिले जात आहे हे स्पष्ट केले. मागील दहा वर्षांमध्ये खेळायला खूप महत्त्व दिले जात आहे आणि खेळाचे बजेट पाच पटीने वाढले आहे असे त्यांनी सांगितले.
मागील तीन ऑलम्पिकमध्ये भारताच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. टोकियो ऑलिम्पिक, रिओ ऑलिम्पिक आणि पॅरिस ऑलिम्पिक त्यामध्ये चांगली कामगिरी केली. मागील ऑलिम्पिकमध्ये भारतीय शूटर्सने चार पदर जिंकले होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये भारताच्या संघाने पहिल्यांदा सिल्वर मेडल नावावर केले होते. सातत्याने मागील काही वर्षांपासून भारताच्या खेळाडूंची प्रगती पाहायला मिळत आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या संघाने अथलेटिक्समध्ये पहिल्यांदा गोल्ड मेडल जिंकले. त्यानंतर भारतीय क्रीडा क्षेत्राला वेगळी दिशा मिळाली आहे.