
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 24 वेळा बडबड म्हणून काँग्रेस सकट विरोधकांना संसदेत आली उबळ, असे संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत घडले.
पहलगामचा हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकिस्तान मध्ये घुसून केलेले ऑपरेशन सिंदूर हा विषय विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत लावून धरला त्यासाठी विरोधकांनी लोकसभेतला प्रश्न उत्तराचा तास पण हाणून पाडला. अध्यक्षांच्या आसनासमोर विरोधकांनी ठाण मांडले त्यामुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारपर्यंत कामकाज स्थगित केले.
पण राज्यसभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नियम 267 ची नोटीस देऊन पहलगाम हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. पहलगाम हल्ल्यामध्ये सामील असलेले दहशतवादी अजून फरार आहेत. त्यांचा कुठेही ठाव ठिकाणा लागलेला नाही सरकारी संरक्षण यंत्रणांनी त्यांना पकडलेले नाही किंवा त्यांना नष्ट केल्याचे देखील जाहीर केलेले नाही. मग हे दहशतवादी आहेत कुठे ?, असा सवाल खर्गे यांनी केला. त्याचवेळी ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात हस्तक्षेप करून युद्धबंदी केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी एक-दोन वेळा नाही तर तब्बल 24 वेळा केला त्याचबरोबर भारताची पाच विमाने पाडल्याचाही दावा त्यांनी केला यासंदर्भात सरकारकडे काही उत्तर आहे, असा सवाल देखील खर्गे यांनी केला.
– परराष्ट्र मंत्रालयाचा स्पष्ट खुलासा
वास्तविक डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच ज्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदीचे क्रेडिट घेतले, त्यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ताबडतोब खुलासा करून असली कुठलीही मध्यस्थी कुणीही केली नसल्याचे आणि ती भारताने स्वीकारली नसल्याचे स्पष्ट केले होते. पाकिस्ताननेच युद्धबंदी मागितली होती भारताने ऑपरेशन सिंदूरचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर ती युद्धबंदी स्वीकारली अशी भूमिका परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृतपणे जाहीर केली होती त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हीच भूमिका वारंवार अधोरेखित केली.
तरी देखील काँग्रेस सकट सर्व विरोधकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच विश्वास ठेवून पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर या विषयांवर शंका कुशंका काढायला सुरुवात केली त्याचेच प्रतिबिंब आज संसदेत पहिल्याच दिवशी उमटले.