
कदम पित्रा पुत्राविरोधात आणखी ‘दारुगोळा’ देणार ?
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्याच नावावर मुंबईमध्ये सावली बार आहे या बार वरून अत्यंत गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी केले आहेत पण तेव्हापासून अनिल परब आणि रामदास कदम यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
दरम्यान आज अनिल परब पत्रकार परिषद घेत सावली बार विरोधात आणखी काही उपयोग गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र ही पत्रकार परिषद अचानक रद्द करण्यात आली.
परब यांना काही महत्त्वाची माहिती देण्यासाठी पोहोचले होते का?
पत्रकार परिषदेची चर्चा रंगली असतानाच रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या भेटीसाठी पोहोचले. त्यामुळे अनिल कदम यांना काही पुरावे देण्यासाठी सदानंद कदम पोहोचले का? अशीच चर्चा रंगली. सदानंद कदम आणि रामदास कदम हे सख्खे भाऊ असले, तरी त्यांच्यामध्ये वाद आहे. त्यामुळे या वादाच्या पार्श्वभूमीवर कदम अनिल परब यांना काही महत्त्वाची माहिती देण्यासाठी पोहोचले होते का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अनिल परबांकडून सावली बारचा गौप्यस्फोट
विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विधान परिषदेमध्ये अनिल परब यांनी कांदिवलीमध्ये सावली बार असून त्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली होती, त्यावेळी 22 बारबाला पकडण्यात आल्या होत्या. या 22 बारबालांसह चार कस्टमर आणि चार कर्मचाऱ्यांना देखील पकडण्यात आल्याचे म्हटले होते. गुन्हाही नोंद करण्यात आला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर सावली बार ज्योती रामदास कदम यांच्या नावे असल्याची माहिती समोर आली. त्या गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत असा अनिल परब यांनी म्हटलं होतं. त्यामुळे एका बाजूला लाडक्या बहिणींचा तुम्हाला आशीर्वाद असताना दुसरीकडे तुम्ही आया-बहिणींना डान्सबार मध्ये नाचवता, अशी विचारणा करत गृहमंत्र्यांच्या राजीनामाची मागणी केली होती.
व्यवसाय करणे गुन्हा आहे का?
दरम्यान, अनिल करम यांच्या आरोपानंतर रामदास कदम यांनी होय माझ्या पत्नीचे नावे सावली बार असल्याचा खुलासा केला होता. बारची मालकी पत्नीच्या नावे असली तरी चालवणारा दुसराच असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान बारमध्ये करारानुसार काही झाल्यास चालवणारा जबाबदार असल्याचे म्हणत रामदास कदम यांनी जबाबदारी झकटण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या पत्नीच्या नावे 30 वर्षांपासून परवाना असून व्यवसाय करणे गुन्हा आहे का? अनिल परब हे अर्धवट ज्ञानी वकील असल्याची टीका रामदास कदम यांनी केली होती.