
प्रेमात पडलं की प्रियकर आणि प्रेयसी सर्व गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास ठेवतात. मग त्याचे परिणाम काहीही झाले तरी फरक पडत नाही. दोन्ही बाजूने विश्वासपूर्ण नातं असेल तर ठीक आहे. पण अनेक प्रकरणात फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.
अनेकदा जोडीदाराचा वापर करून सोडून देण्याचे प्रकार समोर आले आहेत. झारखंडमधील रांची येथे एका नर्ससोबत असंच काहीसं घडलं. नर्स एका फार्मासिस्टच्या प्रेमात बुडाली. त्याने सांगितलेल्या प्रत्येक शब्दावर तिने आंधळेपणाने विश्वास ठेवला. इतकंच काय तर शारीरिक संबंध ठेवण्यासही मागे पुढे पाहीलं नाही. पण गरज पूर्ण झाल्यानंतर फार्मासिस्टने तिची फसवणूक केली आणि लग्नाला नकार दिला. आता नर्स झालेल्या प्रकारासाठी न्याय मागत आहे.पीडितीच्या तक्रारीवरून अर्गोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी फार्मासिस्टला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्स आणि फार्मासिस्ट एकाच रुग्णालयात काम करतात. त्यांच्यात सुरुवातीला मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांमध्ये एक वर्षापूर्वी प्रेमसंबंध सुरु झाले. पण फार्मासिस्टच्या मनात फक्त हवस होती. त्याला फक्त शारीरिक संबंधाची इच्छा होती. त्यामुळे त्याने तिला लग्नाच्या अमिषात गुंतवलं आणि तिनेही त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास टाकला. तो बोलेल तसं ती वागू लागली. त्याने नर्ससोबत शारीरिक संबंधही ठेवले. असं होत राहीलं पण जेव्हा नर्सने लग्नासाठी त्याच्याकडे तगादा लावला तेव्हा त्याने दिलेलं वचन मोडलं. तसेच लग्नाला नकार दिला.
नर्सने रडत रडत सांगितलं की, जेव्हा मी रुग्णालयात रुग्णांना भेटायला यायची तेव्हा फार्मासिस्ट माझ्याशी गोड बोलायचा. त्याच्या गोड बोलण्यात मी गुंतली. त्याने मला विश्वासात घेऊन अनेक आश्वासनं दिली. पण मला कल्पना नव्हती की तो माझ्यासोबत असं काही करेल. त्याने लग्नाचं आश्वासन दिलं होतं. त्याचं लग्नाचा प्रस्ताव मी स्वीकारला आणि आमच्यात एक नातं तयार झालं. मी त्याला कोणत्याच गोष्टीसाठी नकार दिला नाही. कारण तो माझ्याशी लग्न करेल हा विश्वास होता. पण त्याला फक्त शारीरिक गरज भागवायची होती. त्याने माझा विश्वासघात केला. त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा आहे.