
किती महिन्यांचे अनुदान वाटप…
महायुती सरकारने मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. ही योजना पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दर महिना 1500 रुपये देण्यात येतात.
विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीने या योजनेंतर्गत महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. योजनेत 600 रुपयांची वाढ अद्याप झालेली नाही, मात्र आतापर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. आता राखी पौर्णिमा जवळ आली आहे. मात्र जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. पुढील महिन्यात 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण आहे. त्याआधी बहिणींना जूलैचा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा आहे.
राज्य सरकारने गेल्या काही महिन्यात लाडकी बहीण योजनेला अनेक निकष लावले आहेत, त्यामुळे लाखो महिलांची नावे योजनेतून बाद झाली आहेत. मात्र जुलै महिन्याचा हप्ता महिना संपत आला तरी मिळाला नसल्यामुळे राखी पौर्णिमेपूर्वी जुलै आणि ऑगस्टचा हप्ता मिळणार का, याची विचारणा आता होत आहे. दरम्यान या योजनेसंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे. रक्षाबंधनाला राज्य सरकार लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता (3000 हजार रुपये) त्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी महिला आणि बालविकास विभागाकडून लाभार्थी महिलांच्या खात्यात महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पैसे जमा होतात. एक प्रकारे दर महिना मिळाणारे अनुदान महिलांसाठी वेतनाप्रमाणे आहे. जुलै महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे आता बहिणींना रक्षाबंधनापर्यंत पैसे मिळतील का, याची उत्सूकता लागून राहिली आहे. यासंबंधी एका अधिकाऱ्याने सांगितले की, येत्या 5 ऑगस्टपर्यंत बहिणींच्या खात्यात अनुदान जमा होईल. राखी पौर्णिमेनिमित्त अनुदान देण्याची सरकारची तयारी आहे. त्यामुळे बहिणींना राखी पौर्णिमेला सरकारकडून भेट मिळण्याची शक्यता वर्तवली आजत आहे.