उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्याकडून सहकार्य मिळत नसल्याची खंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री अनेकदा बोलून दाखवतात. अजितदादा निधी देत नसल्याची तक्रार देखील अनेकदा या मंत्र्यांकडून करण्यात आली आहे.
संजय शिरसाट, भरत गोगावले यांनी जाहीरपणे यावि
षयी भाष्य केले आहे. त्यामुळे शिंदेंचे मंत्री अजितदादांवर नाराज असल्याची चर्चा होती. ही नाराजी दूर केली जाईल, असे महायुतीमधील नेते सांगत होते. प्रत्यक्षात मात्र ही नाराजी दूर झाली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामुळे दिसून आल्याची चर्चा आहे.
अजितदादांच्या यांचा 22 जुलैला वाढदिवस झाला. त्यानंतर वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सुनील तटकरे यांच्या वतीने नुकताच स्नेहभोजन कार्यक्रमात आयोजित केला होता. या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. भाजपचे आणि राष्ट्रवादीचे मंत्री या कार्यक्रमाला आवर्जून हजर होते.
राष्ट्रवादी आणि भाजपचे मंत्री कार्यक्रमाला हजर होते. एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित असताना मात्र त्यांच्या मंत्र्यांनी मात्र या कार्यक्रमाकडे सपशेल पाठ फिरवली. एकही मंत्री या कार्यक्रमासाठी आला नसल्याची माहिती आहे. बहुतेक मंत्री मुंबईतच होते मात्र त्यांनी या कार्यक्रमाला जाणे टाळल्याची चर्चा आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मंत्री संजय शिरसाट यांनी अजितदादांची भेट घेत आपल्या खात्याच्या निधी संदर्भात चर्चा केली मात्र कार्यक्रमाला ते देखील उपस्थित नव्हते.
‘या’ मंत्र्यांची उपस्थिती
अजितदादांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, आदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते.
