पगार १३२३०० रुपये; MPSC द्वारे जाहीर केली भरती…
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागात भरती जाहीर केली आहे.
गट ब पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली होती. एमपीएससीद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण १०९ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे केली जाणार आहे. १०९ पदांसाठी ही भरती होणार आहे. औषध निरीक्षक (गट ब) पदांसाठी ही भरती होणार आहे.
पगार
अन्न व औषध प्रशासन विभागात नोकरीसाठी निवड झाल्यावर S-15 द्वारे वेतन दिले जाणार आहे. ४१,८०० ते १३२३०० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर शासकीय भत्ते दिले जाणार आहे. या पदासाठी भरती महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये होणार आहे.
या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजे mpsconline.gov.in यावर जाऊन अर्ज करायचा आहे.
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून फार्मसी, फार्मास्युटिकल सायन्स आणि मेडिसिन पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.
एमपीएससीद्वारे (MPSC) ही भरती राबवण्यात आली आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, मुलाखत आणि पर्सॅनिलिटी टेस्टद्वारे केली जाणार आहे. या नोकरीबाबतची सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिचा १ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२५ असणार आहे.
