
भारताच्या अर्थव्यवस्थेला म्हणाले ‘डेड इकॉनॉमी’…
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताच्या अर्थव्यवस्थेला उद्देशून केलेल्या ‘मृत अर्थव्यवस्था या विधानाला समर्थन दिले आहे.
ही बाब संपूर्ण जगाला माहिती असून फक्त भारत सरकार ते स्वीकराण्यास तयार नसल्याचे राहुल गांधी म्हणाले आहेत.
राहुल गांधी काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना लोकसभेतील विरोधीपक्ष नते राहुल गांधी म्हणाले की, “हो, ते बरोबर आहेत. पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना सोडून सर्वांना हे माहिती आहे. सर्वांना माहिती आहे की भारतीय अर्थव्यव्यवस्था ही मृत अर्थव्यवस्था आहे. मला आनंद आहे की अध्यक्ष ट्रम्प यांनी एक सत्य सांगितले आहे… संपूर्ण जगाला माहिती आहे की भारतीय अर्थव्यवस्था मृत अर्थव्यवस्था आहे. भाजपाने अदाणी यांची मदत करण्यासाठी अर्थव्यवस्था संपवली आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट देखील केली आहे, ज्यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. “भारतीय अर्थव्यवस्था मृत आहे. मोदींनी तिली मारले आहे. १) अदाणी मोदी भागीदारी २) नोटबंदी आणि एक सदोष जीएसटी ३) असेंबल इन इंडियामधील अपयश ४) एमएसएमईची पूर्णपणे नस्ट झाले ५) शेतकरी चिरडले गेले. मोदींनी भारतातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे कारण नोकऱ्या नाहीत,” अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली आहे.
सरकारच्या आर्थिक धोरणांनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली आहे. यानंतर सरकारवर विरोधकांकडून कडाडून टीका केली जात आहे. यादरम्यान राहुल गांधी यांनी हे विधान केले आहे.
भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारी संबंधांवर टीका करताना डोनाल्ड ट्रम्प गुरूवारी म्हणाले होती की, भारत रशिया बरोबर काय करतो याची त्यांना पर्वा नाही, तसेच यावेळी त्यांनी दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मृत असल्याचा आरोप देखील केला.
भारत हा रशियाबरोबर काय करतो याची मला पर्वा नाही. ते त्यांच्या मृत अर्थव्यवस्था बरोबरीने खाली घेऊन जाऊ शकता, मला जराही पर्वा नाही,” असे ट्रम्प ट्रूथ सोशलवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हणाले आहेत. “आम्ही खूप कमी प्रमाणात भारताबरोबर ल्यापार केला आहे, त्यांचे टॅरिफ हे खूप जास्त आहेत, जगातील सर्वात जास्तपैकी आहेत.”
रशियाबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले की, “याचप्रमाणे, रशिया आणि अमेरिका यांच्यात जवळपास कसलाच व्यापार होत नाही. आपण ते तसेच ठेवूया आणि रशियाचे माजी अपयशी अध्यक्ष मेदवेदेव यांना, ज्यांना अजूनही ते राष्टाध्यक्ष आहेत असे वाटते त्यांना सांगूया की त्यांनी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं.ते खूप धोकादायक प्रदेशात प्रवेश करत आहेत !