
अजित पवारांकडून कार्यकर्त्यांची कानउघडनी; थेट कडक शब्दांत सुनावलं नेमकं काय म्हणाले ?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आज १ अॉगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती असल्याने सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अजित पवार यांनी पुण्यातील स्वारगेट परिसरातील सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अजित पवारांनी त्यांच्या अनोख्या शैलीत पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी झालेल्या आहात. तुमच्याकडून कधी कोणती चूक होऊ देऊ नका, असा सल्ला अजित पवारांनी दिला.
कुठं चौफुल्याला तरफडू नका, तिथं जाऊन कुठं ठक् ठक् ढगात गोळी झाडू नका, असं अजित पवार म्हणाले आहेत. हे असलं अजिबात चालणार नाही, असा थेट इशार त्यांनी यावेळी बोलतााना दिला. माणुसकी लक्षात ठेवा जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता जातीय सलोखा ठेवा, असं अजित पवारांनी सांगितलं आहे. हे शिव शाहू फुले आंबेडकरांची विचार धारा आहे तिचं अण्णाभाऊ साठेंची विचार राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची विचारधारा असल्याचे ते म्हणाले.
हे अजितबात चालणार नाही
पुण्यातील चौफुला येथील एका कलाकेंद्रात गोळीबाराची धक्कादाक घटना समोर आली होती. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावला बाळासाहेब मांडेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले की आम्ही सांगत का गोळ्या झाडा, हे चालणार नाही असं अजित पवार म्हणाले.सरपंचाच्या घरात लग्न असेल, तर आम्ही जाणार आम्हाला काय माहिती पुढं काय दिवा लागणार आहे, असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.