
दोषमुक्तीसाठी वाल्मिक कराडची तडफड; घेतला मोठा निर्णय…
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच गाजले होते. आमदार धनंजय मुंडेच्या जवळचा सहकारी असलेला वाल्मिक कराडचा या प्रकरणात हात असल्याचा आरोप आहे. सध्या वाल्मिक कराडला दुसऱ्या एका गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.
अशातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती समोर आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातीर आरोपी वाल्मिक कराडने आपण दोषी नसल्याचा अर्ज बीड विशेष न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत केला होता. मात्र हा अर्ज कोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर आता वाल्मिक कराडने वकिलांच्या मार्फत हायकोर्टात धाव घेतली आहे. दोष मुक्तीच्या अर्जासंदर्भात आणि दोषारोप पत्रासंदर्भात हायकोर्टात रीट पिटीशन दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात दोषमुक्तीसाठी वाल्मिक कराडची तडफड सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराडने बीडच्या कोर्टाकडे अर्ज केला होता तेव्हा कोर्टाने महत्वाची निरिक्षणे नोंदवली होती. न्यायालयाने वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले होते. तसेच वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे, असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं होत.
वाल्मिक कराड यांनी अवदा कंपनीकडून खंडणी वसूल करण्यासाठी कट रचला. वाल्मिक कराड सह टोळीवर एकूण 20 गुन्हे तर सात गंभीर गुन्हे मागच्या 10 वर्षात दाखल झालेले आहेत. वाल्मिक कराडच्या विरोधात डिजिटल पुरावे सुद्धा आहेत. अनेक साक्षीदारांचे जबाब, तांत्रिक, डिजिटल वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे कराडच कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
त्याचबरोबर 2 कोटींसाठी कराड आणि त्याच्या साथीदारांनी अवदा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या होत्या. खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला म्हणूनच कराड आणि साथीदारांनी हा कट रचला आहे. तर हा खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारणं आहेत म्हणून याचिका फेटाळतो असंही कोर्टानं म्हटलं होतं. त्यानंतर आता वाल्मिक कराडने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.