
पुणे: दिनांक 2 ऑगस्ट 2025 शनिवार रोजी वात्सल्य पब्लिक स्कूल आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त क्रिडा प्रशिक्षक श्री. कृष्णा हनुमंत आडागळे यांच्या पुढाकाराने तसेच नॅशनल स्पोर्ट्स अॅड फिजिकल फिटनेस बोर्ड, भारत या राष्ट्रीय शासन मान्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली वात्सल्य प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते यात आठ संघानी सहभाग घेतला होता त्यांची नावे पुढीलप्रमाणे १) वात्सल्य सुपर किंग, २) वात्सल्य इंडियन, ३) रॉयल चॅलेंजर वात्सल्य, ४) किंग इलेवन वात्सल्य, ५) वात्सल्य टायटन, ६) वात्सल्य कॅपिटल, ७) वात्सल्य रॉयल्स, ८) वात्सल्य नाइट रायडर.
या स्पर्धेचे उद्घाटन वात्सल्य पब्लिक स्कूल चे संचालक राजीव अरोरा यांच्या हस्ते झाले यावेळी शाळेच्या व्यवस्थापिका कोमल ओझा व प्राचार्या बिष्णु भंडारी मुख्याध्यापिका शिल्पा पल्ली उपस्थित होत्या. या आठ संघांमध्ये लीग स्टेज चे 12 सामने खेळवण्यात आले यातून पुढे सुपर फोर टीम निवडण्यात आल्या व त्यानंतर अंतिम फेरीतील थरार रंगला. सगळ्याच संघानी वरचढ कामगिरी केली अंतिम फेरीतील चार संघ १) वात्सल्य इंडियन, २) रॉयल चॅलेंजर्स वात्सल्य, ३) किंग इलेवन वात्सल्य, ४) वात्सल्य सुपर किंग हे होते अंतिम सामना वात्सल्य इंडियन विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स वात्सल्य असा झाला शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना पाहून उपस्थितांना आनंद झाला तसेच पालकांना हे सामने घरून पाहता यावे यासाठी विशेष सोय करण्यात आली होती.
या स्पर्धेत काही खेळाडूंनी विशेष कामगिरी केली त्यांची नावे पुढीलप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज म्हणून सुगत साबळे, वैभव नवगिरे, उत्कृष्ट गोलंदाज आरव चुरमुले, सात्विक गायकवाड, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ऋषभ साबळे, सचिन सिंगा तसेच उत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून प्रथमेश देवकर तर अष्टपैलू खेळाडू म्हणून अंश यादव, शरण गायकवाड याला सन्मानित केले स्पर्धेत एमर्जिन प्लेअर म्हणून हितेश पटेल व स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट चा किताब सोहम बनसोडे यास देऊन सन्मानित करण्यात आले. यास्पर्धेच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजावणारे एम्स क्रिकेट क्लब ऑफ महाराष्ट्र चे सिनियर खेळाडू आणि एम मल्टी स्पोर्ट्स अँड एज्युकेशन फाउंडेशन भारत चे सदस्य सुरज राय, ओमकार पुजारी, विशाल पवार, प्रेम गायकवाड, अर्जुन पवार, गीतेश पारचे, कार्तिक खुडे, समर्थ तोडकरी, महेंद्र चौधरी, प्रथम कोर्जल, समृद्ध निर्मळकर, सौभाग्य पलाई, वैष्णवी घुगे, वैष्णवी पुजारी, गायत्री पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली.
वात्सल्य पब्लिक स्कूल चे संस्थापक श्री. राजीव अरोरा सर द वात्सल्य स्कूल उंड्री संचालिका सौ. विनिता अरोरा मॅडम तसेच शाळा व्यवस्थापक सौ. कोमल ओझा मॅडम त्याचबरोबर माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. बिष्णु भंडारी मॅडम प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. शिल्पा पल्ली मॅडम, लिपिक श्री. शिवशंकर कनोजिया सर तसेच विद्यालयाचे लिपीक लेखापाल श्री. संतोष कालेकर सर यांनी खेळाडूंचे कौतुक केले व विजयी संघाचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.