
मोदींनी गेम फिरवला! पुतीन यांना निमंत्रण !
रशियाकडून तेल खरेदी करू नका, असे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लादला आहे. जोपर्यंत भारत रशियासोबत व्यापार थांबवत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा करणार नसल्याचा पवित्र ट्रम्प यांनी घेतला.
मात्र, ट्रम्प यांच्या दबावाला न जुमानता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले.
या वर्षाच्या शेवटी होत असलेल्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी यांनी पुतन यांना निमंत्रण देत अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नसल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे चीनने देखील भारताला पाठींबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या महिन्याच्या अखेरीस चीन दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवासंपासून सातत्याने भारताच्या विरोधी भूमिका घेताना पाहण्यास मिळत आहे. भारत रशियाकडून तेल खरेदीकरून ते खुल्या बाजारात विकून नफा कमवत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. भारत-रशिया व्यापारातील पैसे रशिया युक्रने विरूद्धच्या युद्धात वापरत असल्याचे देखील म्हटले होते.
पुतीन यांच्याकडून युक्रेनसोबत युद्धाची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पुतीन यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला. रशिया-भारत वार्षिक शिखर परिषदेसाठी मोदींनी पुतीन यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले. दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये रशिया-युक्रेन युद्धाबाबत देखील चर्चा झाली. पुतीन यांनी मोदींना युक्रेनसोबत सुरू असलेल्या संघर्षाची माहिती दिली.
टॅरिफचा भारतावर परिणाम नाही
भारताच्या एकुण जीडीपीच्या केवळ दोन टक्के व्यापार हा अमेरिकेसोबत होत आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफचा मोठा फटका भारताला बसणार नाही, असे तज्ज्ञ सांगत आहे. भारतीय अर्थव्यवस्थ ही वेगाने विकास करत आहे तिची गती मात्र थोडी कमी होऊ शकतो. ‘मुडीज’ने वर्तवल्या अंदाजानुसार भारताचा जीडीपी सहा टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे.