
अखेर उद्धव ठाकरेंनी सांगून टाकलं; केलं मोठं वक्तव्य…
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्धार मेळाव्यात बोलताना जनसुरक्षा कायद्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच महाविकास आघाडी कशी झाली, शरद पवार आणि आम्ही एकत्र का आलो यावर देखील त्यांनी यावेळी भाष्य केलं.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील उपस्थित होते.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मला प्रश्न पडला की मी डावा आहे की, उजवा आहे? दोन्ही हात आपलेच आहेत. त्यामुळे डावा, उजवा करण्याची गरज नाही. हा कायदा किती वाईट आहे, किंवा या कायद्याचा उपयोग सर्वसामान्यांविरोधात कसा केला जाऊ शकतो? हे जोपर्यंत पटून देणार नाही तोपर्यंत उठाव होणार नाही, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, सत्ताधारी काय म्हणतील? तुम्ही विरोधक आहात तुम्ही विरोधात बोलणारच, पण आम्ही तुमच्या सडलेल्या मानसिकतेविरोधात आहोत, देशाच्या किंवा राज्याच्या विरोधात नाही. आम्ही सुद्धा भाजपसोबत 25 ते 30 वर्ष घावलीच ना फुकट, शरद पवार साहेब आणि बाळासाहेब यांचं नात तर तुम्हाला माहीतच आहे, मतभेद टोकाचे पण मैत्री त्यापलीकडची. थोडक्यात काय तर त्यांच्यामध्ये मतभेद होते. शिवसेना आणि कम्युनिष्ठांमध्ये देखील प्रचंड संघर्ष झाला. पण राजकारणात व्यक्तिगत द्वेष सूड असता कामा नये, म्हणूनच शरद पवार, आम्ही आणि काँग्रेस एकत्र येऊ शकलो, कारण सगळ्यांच्या मनामध्ये देशप्रेम हा कॉमन धागा होता, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना त्यांनी जनसुरक्षा विधेयकावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जात -पात धर्म काही बघू नका, जो कोणी देशाविरोधात कारवाया करेल त्याला फासावर लटकवा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. पण वसई, विरारच्या माजी आयुक्ताला अटक झाली कारण त्यांच्याकडे रोकड सापडली. मग मंत्र्याच्या घरात रोकड सापली त्याला अटक का झाली नाही? त्याला समज देऊ सोडलं, अशा खोचक टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.