
पण शरद पवारांना खटकली ‘ही’ गोष्ट…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध गोष्टींवर भाष्य केलं. ,मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या या भाषणावरून त्यांच्यावर टीका केली आहे.
पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात केंद्र सरकारवर सडकून टीका केली.
शरद पवार म्हणाले, आज देशाचे चित्र बदलत आहे.सध्या आम्ही पार्लमेंटचे सदस्य आहोत. त्या ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. गेले 14 दिवस पार्लमेंट सुरू आहे. मात्र गेल्या 14 दिवसात त्या ठिकाणी काहीच काम झालेलं नाही. आम्ही रोज त्या ठिकाणी जातो सही करतो त्यानंतर आत मध्ये गेल्यानंतर दंगा सुरू होतो आणि त्यानंतर काम बंद पडतं मग पुन्हा दुसऱ्या दिवशी जावं लागतं, अशीच स्थिती पूर्वी नव्हती.
राज्यकर्त्यांकडून ज्या पद्धतीने संसदीय कामकाज सुरू आहे. ते लोकशाहीला आणि संसदीय लोकशाहीला न पटण्यासारखं आहे. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी आम्ही सर्वजण दिल्लीमध्ये एकत्र बसलो, त्यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी इतर पक्षातील वरिष्ठ नेते होते. आम्ही ठरवलं की, रोज रोज काम बंद पडतं तर याबाबत काहीतरी ठोस असं पाऊल टाकणं आवश्यक आहे.
त्यात दृष्टिकोनातून सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी विरोधात एकत्रित भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचं ठरवून संसदेच्या इतिहासात पहिल्यांदाच 300 खासदारांनी बाहेर येऊन संयमाने आंदोलन केलं. मात्र, आम्हा 300 लोकांना पोलिसांनी अटक करून पोलीस स्टेशनला नेलं ही घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही आवाज उठवला आणि त्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी हि कृती केलं.
शरद पवार पुढे म्हणाले, काल मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकलं स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला दृष्टी देण्याचं काम देशाचे पंतप्रधान करत असतात. आनंद आहे की त्यांनी त्या ठिकाणी ते काम केलं. मात्र 15 ऑगस्ट च्या दिवशी केलेल्या लाल किल्ल्यावरील भाषणामध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूचे नाव येत नाही ही गोष्ट अस्वस्थ करणारे आहे.
शरद पवार पुढे म्हणाले, काल मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकलं स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला दृष्टी देण्याचं काम देशाचे पंतप्रधान करत असतात. आनंद आहे की त्यांनी त्या ठिकाणी ते काम केलं. मात्र 15 ऑगस्ट च्या दिवशी केलेल्या लाल किल्ल्यावरील भाषणामध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू चे नाव येत नाही ही गोष्ट अस्वस्थ करणारे आहे.
आयुष्यातील उमेदीचा काळ यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिला. कशाचाही विचार केला नाही. अगदी घराचा देखील. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांनी हा देश एकसंघ ठेवण्यासाठी त्याचं नेतृत्व केलं. जगभरामध्ये देशाची महती वाढवण्याचे काम त्यांनी केलं. जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी त्यासाठी त्यांनी पंचशील तत्त्वांचा विचार जगासमोर मांडला.
अशा महान व्यक्तीचे नाव 15 ऑगस्टच्या दिवशी देशाच्या नेतृत्वाकडून घेण्यात आलं नाही. ही एक प्रकारची चिंताजनक गोष्ट आहे. त्यामुळे या सर्व स्थितीला उत्तर देण्यासाठी गांधी नेहरूंचे विचार सर्वदूर पोचवले पाहिजेत असं शरद पवार म्हणाले.