
मुंबईत १७० मिलिमिटर पाऊस तर मराठवाड्यातल्या ८०० गावांना अतिवृष्टीचा फटका !
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातल्या पावसाचा आढावा घेतला. तसंच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मुंबईत आज सकाळी ६ ते ८ या कालावधीत १७० मिलिमिटर पावसाची नोंद झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.
कोकण विभागाचं सर्वात जास्त पाऊस झाल्याचं ते म्हणाले. १५-१६ जिल्ह्यांना पावसाचा रेड तसंच ऑरेंज अलर्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या ८०० गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून १ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी सुरु असल्याने हजारो हेक्टर शेती अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे. तसेच अनेक भागात पशुधनाचीही मोठी हानी झाली आहे. आधीच सरकारच्या सुलतानी धोरणाने शेतकरी अडचणीत असताना आता अस्मानी संकटानेही शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं काम झालं. या संकटातून कोलमडलेल्या शेतकऱ्याला उभं करण्यासाठी नजर पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. शिवाय आपत्कालीन परिस्थितीत लोकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना याकडे लक्ष ठेवण्याच्या सूचनाही सरकारने द्याव्यात असे रोहित पवार यांनी सांगितले.