
आकडा वाचून धक्का बसेल…
भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी करतो, एप्रिलपासून ते जूनपर्यंत आयओसीच्या आकडेवारीनुसार भारतानं आपल्या एकूण तेलाच्या गरजेपैकी 35 ते 40 टक्के कच्च्या तेलाची खरेदी ही रशियाकडून केली आहे.
सुरुवातीला भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या बदल्यामध्ये प्रति बॅरलवर 40 डॉलरची सूट मिळत होती, मात्र त्यानंतर गेल्या महिन्यामध्ये ही सवलत कमी करण्यात आली आहे, आता भारताला रशियाकडून प्रति बॅरलवर फक्त 1.5 डॉलर एवढीच सूट मिळत आहे, त्यामुळे रशियाकडून खरेदी करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलाचं प्रमाण देखील घटलं आहे, त्यानंतर रशियानं पुन्हा एकदा ही सूट वाढून 2.70 डॉलर प्रति बॅरल एवढी केली आहे. त्यामुळे आता अनेकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला आहे, की जर भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची आयात केली नाही, किंवा कमी केली तर त्याचा परिणाम येथील पेट्रोल, डिझेलच्या किंमतीवर पडू शकतो का? पेट्रोल, डिझेल किती रुपयांनी महाग होऊ शकतं? जाणून घेऊयात.
काही दिवसांपूर्वीच आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं होतं की, जर भारताने रशिया सोडून इतर कोणत्याही देशाकडून कच्च्या तेलाची खरेदी केली तर त्याचा फारसा परिणाम हा भारतावर होणार नाही. मात्र खरचं असं होऊ शकतं का? भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे. भारत जवळपास 85 टक्के कच्चे तेल इतर देशांकडून खरेदी करतो, ज्यामध्ये 2025 पासून रशियाचा वाटा हा सर्वाधिक 35 टक्के इतका आहे. चीन हा रशियाकडून भारतापेक्षाही अधिक तेलाची खरेदी करतो.
अशा परिस्थितीमध्ये जर भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी बंद केली तर भारताला कच्च्या तेलासाठी सौदी अरब, अमेरिका, इराण सारख्या देशांवर अवलंबून राहावं लागेल. मात्र या देशातील तेलाची खरेदी करणं हे रशियातून तेलाची खरेदी करण्याइतक सोपं नाही. रशिया भारताला क्रूड ऑईलच्या खरेदीवर प्रति बॅरलमागे मोठं डिस्काउंट देतो. जर भारतानं रशिया सोडून इतर देशांकडून कच्च तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर भारताला कोणतंही डिस्काउंट मिळणार नाही, त्यामुळे भारताला महाग कच्च्या तेलाची खरेदी करावी लागेल, अशा परिस्थितीमध्ये भारतात पेट्रोल, डिझेलचे भाव प्रति लिटर मागे 8 ते 12 रुपयांनी महाग होतील, यामुळे देशातील महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.