
मुंबई महापालिकेच्या विजयाचा मार्ग मोकळा ?
मराठीच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उबाठा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले. महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची पंचवार्षिक निवडणूक लढवली.
ही निवडणूक 18 ऑगस्ट रोजी सोमवारी पार पडली असता, या निवडणुकीत एकूण 83 टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. ही निवडणूक ठाकरे बंधुंसाठी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फार महत्त्वाची ठरणार आहे. याचा महापालिकेच्या निवडणुकीवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे बोलले जातेय. याच निवडणुकीत ठाकरे बंधुंचा डंका वाजला आहे. यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर ठाकरे बंधुंना यश मिळण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
ठाकरेंचा महायुतीवर सुफडासाफ
या निवडणुकीत ठाकरे बंधुंनी उत्कर्ष हे संयुक्त पॅनेल रिंगणात उतरवले होते. तर त्यांच्या विरोधात आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या श्रमिक उत्कर्ष सभेसह, मंत्री नितेश राणे यांच्या समर्थ बेस्ट पॅनेल संघटनेनंही आपलं पॅनेल उभं केलं. प्रचारादरम्यान, ही निवडणूक ठाकरे बंधु आणि प्रसाद लाढ यांच्यातच रंगल्याचं दिसून आलं. या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकहाती….मतं मिळाली आहेत. तर महायुतीचा सुफडा साफ केल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
नऊ वर्षानंतर निवडणूक
ही बेस्ट कामगारांच्या पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर पार पडली. याच पंचवार्षिक योजनेचा निकाल लागण्याआधीच शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जल्लोष केला आहे. हा निकाल 19 ऑगस्ट रोजी सकाळी 9 पासून सायंकाळी 5 वाजेच्यादरम्यान जाहीर करण्यात येणार असं सांगितलं होतं. परंतु, पावसामुळे मतमोजणीत काही प्रमाणात तांत्रिक अडथळा निर्माण झाल्यानं निकालाला काही तास विलंब झाल्याचं बोललं जातंय.
मात्र, काहींना निकालापूर्वीच सोशल मीडियाद्वारे विजयाची घोषणाबाजी केली. दरम्यान ही निवडणूक बेस्ट उपक्रमांच्या सर्व आगारांमध्ये तसेच बेस्टच्या विविध कार्यालयातील 35 केंद्रांवर पार पडली. वडाळा येथे मतमोजणीस विलंब झाला असला तरीही निकाल ठाकरे बंधूंच्या बाजूने लागल्याचं चित्र स्पष्ट झालं.