
दैनिक चालु वार्ता इगतपुरी प्रतिनिधी – श्री.विकास पुणेकर
इगतपुरी- १५ ऑगस्ट २०२५ रोजी पोदार प्रेप, इगतपुरी येथे स्वातंत्र्यदिनाचा सोहळा विशेष उत्साहात आणि वेगळ्या ढंगाने साजरा करण्यात आला. यावर्षीची थीम “United Flavours of India” अशी होती.
या विशेष दिवशी विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा आणि पालकांनी मास्टर शेफ उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. भारतीय ध्वजातील रंगानुसार त्यांनी आपले खाद्यपदार्थ सादर केले होते. या उपक्रमातून भारताची संस्कृतीतील विविधता आणि खाद्यपरंपरेतील एकता उत्तम प्रकारे अधोरेखित झाली.
कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे प्राचार्य श्री.संदेश खताळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन रकाबी द फन हॉटेल चे एक्झीक्युटीव्ह शेफ श्री.राजेश शर्मा यांची उपस्थिती लाभली. पालकांनी शाळेच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले आणि तो मुलांसाठी शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करणारा असल्याचे नमूद केले.
हा सोहळा विविधतेतील एकतेचे प्रतीक ठरला आणि सर्वांनाच एक संस्मरणीय अनुभव देऊन गेला.