
देशासह महाराष्ट्रात एकीकडे मतचोरीच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. निवडणूक आयोगासह भाजपवरही विरोधकांकडून गंभीर हल्ले चढवले जात आहे.अशातच आता लोकनीती सीएसडीएस या मतदानाचं विश्लेषण करणाऱ्या संस्थेच्या प्रमुखांनीच मतदारांच्या याद्यांमध्ये घोळ असल्याचा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली होती.
यानंतर विरोधकांच्या दाव्यांना आणखी बळ मिळाल्याचं दिसून आलं होतं. पण आता सीएसडीएसच्या प्रमुख असलेल्या संजय कुमारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सीएसडीएसचे प्रमुख संजय कुमार यांनी लोकसभा निवडणुकीतील मतदारांची संख्या आणि सहा महिन्यांनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदारांची संख्या याच्या फरकाबाबत लोकनीती सीएसडीएस या मतदानाचं विश्लेषण करणाऱ्या संस्थेनं आपली डेटा विश्लेषणात घोडचूक झाली असल्याचं या कंपनीचे सह-संचालक संजय कुमार यांनी ट्विटद्वारे जाहीर कबुली दिली होती. याबाबत ट्विट करत त्यांनी माफी देखील मागितली आहे.
आता सीएसडीएसचे प्रमुख संजय कुमार यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. महाराष्ट्रातील मतदारयाद्यांत मोठा घोळ असल्याचा आरोप केलेल्या संजय कुमार यांच्या आरोपांविरोधात निवडणूक आयोगानं पोलिसांत तक्रार दाखल केली होती. कुमार यांच्याविरोधात आता नाशिक व नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकनीती-सीएसडीएस प्रकल्पाचे सह-संचालक कुमार यांनी 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील चार मतदारसंघांमधील मतदारांच्या संख्येत मोठा बदल दर्शविणारे आकडे पोस्ट केले होते.
त्यापैकी दोन मतदारसंघांमध्ये मोठी घट दिसून आली तर दोन मतदारसंघांमध्ये अचानक वाढ दिसून आली होती. त्यांचे हे ट्विट वेगानं व्हायरल झालं होतं. यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात मतदारांची नाव वगळण्यात आली आहेत किंवा अस्पष्टपणे जोडण्यात आले असल्याची शक्यता या डेटामधून केलं समोर आलं होतं. काँग्रेसनंही संजय कुमार यांचं ट्विट शेअर करत निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली होती.
संजय कुमार यांनी ‘महाराष्ट्र निवडणुकीची काही माहिती’ या शीर्षकाखाली दोन स्वतंत्र ट्विट शेअर केले होते. यामध्ये एकत्रितपणे, त्यांनी चार मतदारसंघांमधील डेटा मांडला होता. त्यांनी दावा केला की, रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदारांची संख्या 4.66 लाखांवरून विधानसभा निवडणुकीत 2.86 लाखांवर आली.
म्हणजेच 38..45 टक्क्यांनी घट झाली. देवळालीमध्येही असाच प्रकार दिसून आला, मतदारांची संख्या 4.56 लाखांवरून 2.88 लाखांवर आली आहे, म्हणजेच 36.82 टक्क्यांनी घट झाली आहे. याउलट, नाशिक पश्चिममध्ये 47.38 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मतदारांची संख्या लोकसभा निवडणुकीत 3.28 लाखांवरून वाढून विधानसभा निवडणुकीत ४.79लाख झाली. हिंगणघाटमध्येही असामान्य वाढ दिसून आली, ती 3.14 लाखांवरून 4.5 लाखांवर पोहोचली, म्हणजेच 43.08टक्क्यांनी यात वाढ झाली.