
पलंग-सोफा बनली चिता…
जम्मू-काश्मीरमध्ये एक अत्यंत भयानक आणि वेदनादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. तेथील रामनगरमध्ये असा हादरवणारा प्रपकार घडला, ज्याच्या किंकाळ्या- आरोळ्या अनेक गावांमध्ये ऐकू गेल्या.
एका कुटुंबाने अतिशय थाटामाटत लाडक्या लेकीचं लग्न लावून दिलं, मात्र लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच त्या मुलीची अंत्ययात्रा निघाली. पण त्यानंतर मुलीच्या माहेरच्या लोकांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने, आणि फिल्मीरित्या मुलीच्या सासरच्या लोकांचा बदला घेतला. त्या ससारच्या लोकांनी हुंड्यासाठी निष्पाप सुनेचा छळ करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांनी स्मशान घाटावर जाण्याऐवजी तिचं सासर हेच स्मशान बनववं, तिच्या ससारच्या अंगणातच तिचे अंत्यसंस्कार केले. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
खरंतर, ही कहाणी जम्मूमधील रामनगरची आहे. ही दुःखद घटना उघडकीस आली जेव्हा सासरच्यांनी त्यांच्या सुनेला मारहाण करून ठार मारले. सासरच्यांनी हुंड्यासाठी तिची हत्या केल्याचा आरोप आहे. तिच्या माहेरच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, शालू असे मृत महिलेचे नाव असून ती अवघ्या 27 वर्षांची होती. अनेक स्वप्न रंगवून, मोठ्या थाटामाटात शालूचे लग्न लावून देण्यात आलं होतं, पण तिच्या सासरच्या लोकांच्या लोभाने आणि हुंड्याच्या हव्यासाने तिच्या आयुष्यावर परिणाम केला.. तिचा जीवच गेला.
मारहाण करून घेतला शालूचा जीव
लग्न झाल्यापासूनच शालूला सतत हुंड्यासाठी त्रास दिला जात होता, असा तिच्या पालकांचा आरोप आहे. त्यामुळे ती खूप अस्वस्थ होती. तिला मारहाण करण्यात आली. आता तिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. शालूच्या मृत्यूची बातमी तिच्या पालकांना कळताच गोंधळ उडाला.
सासरच्या अंगणातच केले अंत्यसंस्कार
जेव्हा शेजाऱ्यांनी शालूच्या पालकांना याबद्दल माहिती दिली तेव्हा संतापाने आणि शोकाकुल कुटुंबीय त्यांच्या मुलीच्या शालूच्या, साससरी पोहोचले. ते सर्वांनी त्यांचा राग व्यक्त केला,एकच दारोल माजला. मात्र खरी खळबळ तेव्हा पसरली जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी रागाच्या भरात त्याच घरात शालूचे अंत्यसंस्कार केले. प्रथम, शालूच्या पालकांनी तिच्या लग्नाच्या वेळी हुंडा म्हणून दिलेल्या वस्तू गोळा केल्या. त्यांनी हुंडा म्हणून दिलेल्या वस्तू, बेड आणि सोफा यांचीच चिता तयार केली आणि शालूवर तिच्या सासरच्या घराच्या अंगणातच अंत्यसंस्कार केले.
गावकरी झाले स्तब्ध
हे वेदनादायक दृश्य पाहून संपूर्ण गाव स्तब्ध झाले. आजूबाजूच्या गावातील लोकांची गर्दी जमली होती. सर्वत्र शोक आणि दुःखाचे वातावरण होते. मुलीचे पालक खूप रडत होते. सध्या या मृत्यूपोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि सासरच्यांना ताब्यात घेतले आहे. मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून तपास सुरू आहे.