
लक्ष्मण हाकेंचा घणाघात म्हणाले; राज्यात संघर्ष यात्रा निघणार…
बीड : ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी महाराष्ट्रात ओबीसींची संघर्ष यात्रा निघणार असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जाहीर केलंय. या अनुषंगाने लक्ष्मण हाके मराठवाड्यातील जिल्ह्यात बैठका घेत आहेत.
जरांगेंच्या आंदोलनाला ओबीसीचे काउंटर आंदोलन नसून मुंबईत जाऊन ट्रॅफिक जाम केली जाणार नाही. तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होणार आहे. आमचे आंदोलन व्यवस्थेला चॅलेंज करणारे नसून संविधानाला धरून असणार आहे. अशीप्रतिक्रिया ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलीय. तेबीडयेथेबोलतहोते.
शरद पवारांच्या सांगण्यावरूनच जरांगे नावाचे मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलं
महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं असून 29 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईकडे मोर्चा वळवणार आहेत. मात्र, ओसीबी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काही नेत्यांकडून जाणीवपूर्वक शरद पवारांना लक्ष्य केलं जातं. सध्या ओबीसी (OBC) आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या लक्ष्मण हाके यांनीही गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यावर आक्रमकपणे टीका केलीय. अशातच मराठा- ओबीसी वादाचे मूळ शरद पवार आहेत. शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच जरांगे नावाचे मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसले आहे. अशीबोचरीटीका लक्ष्मण हाके यांनीकेलीय. यावेळीबोलतानात्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरहीटीकाकेलीआहे.
पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते मुंबईला निघालेत
मराठा आरक्षण मागणं हा जरांगे पाटील यांचा फास आहे. ओबीसी आरक्षण संपवणे हा त्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप हाके यांनी केलाय. त्यांना आरक्षणाचे काही पडले नसून ओबीसीचे आरक्षण संपवायचे आहे. पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते मुंबईला निघाले आहेत. महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा हा वाद कधीच नव्हता. मात्र, या वादाचे मूळ शरद पवार आहे. त्यांच्या सांगण्यावरून जरांगे नावाचे मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसले असून याने महाराष्ट्रातील भाईचारा बिघडल्याचं म्हणत हाके यांनी शरद पवार यांना लक्ष केलंय.