
भारताला लागला डबल जॅकपॉट !
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, सुरुवातीला त्यांनी 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, त्यानंतर भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला.
येत्या 28 ऑगस्टपासून भारतीय वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ आकारला जाणार आहे. मात्र आता मोठी बातमी समोर येत ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता चीन आणि रशिया यांची भारतासोबत जवळीक वाढत आहे, यामुळे अमेरिकेच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.
भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला आहे. तसेच जे देश रशियाकडून तेल खरेदी करतात, त्यांच्यावर देखील टॅरिफ लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे, दरम्यान अमेरिकेनं टॅरिफ लावण्यानंतर आता रशिया भारतासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे, रशियानं भारताचं समर्थन करतानाच अमेरिकेला सुनावलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार रशियन दूतावासाकडून अमेरिकेच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे, जर भारतीय सामान अमेरिकेमध्ये जाणार नसेल तर ते आपलं सामान रशियामध्ये पाठवू शकतात. आम्ही त्यांचं स्वागत करू, अमेरिकेनं भारतावर जो टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे, तो अतिशय चुकीचा आहे, अमेरिका भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असं रशियाच्या दूतावासानं म्हटलं आहे.
दरम्यान रशियाच्या दूतावासानं असं देखील म्हटलं आहे की, भारताला रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवर मोठी सूट मिळत आहे, त्यामध्ये भारताचा फायदाच फायदा आहे. त्यामुळे भविष्यातही भारत तेल खरेदीचा आपला निर्णय बदलेल असं आम्हाला वाटत नसल्याचं रशियाच्या दूतावासानं म्हटलं आहे.
दुसरीकडे भारताला चीनचा देखील पाठिंबा मिळत आहे, चीनच्या दूतावासानं देखील भारताला समर्थन दिलं आहे. भारत आणि चीन जर एकत्र आले तर व्यापार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. भातीय वस्तुंच आम्ही आमच्या बाजारपेठेत स्वागत करू असं चीनने म्हटलं आहे. त्यामुळे आता अमेरिकन बाजारपेठेच्या बदल्यात भारतासाठी या दोन्ही मोठ्या देशांच्या बाजारपेठा ओपन होण्याची शक्यता आहे, टॅरिफनंतर भारत, चीन आणि रशियाची वाढत असलेली जवळीक हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.