
मनोज जरांगे म्हणाले; आता चर्चेचा कंटाळा आला…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे.
आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्याची आमची पंरपरा आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत चर्चा करणार मात्र आता चर्चेचा कंटाळा आहे. जर आरक्षण देणार नसाल तर 27 तारखेला अंतरवालीमधून मुंबईकडे कूच करणारच, असा निश्चय मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. गणपती उत्सव आहे, तेव्हा गणपती उत्सव झाल्यानंतर त्यांनी मुंबईत यावे अशी विनंती करायला आलो असल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक साबळे यांनी म्हटले आहे.
दोन वर्ष सरकारच्या विनंती मान्य केली आहे.
चर्चा होत राहतात. आयुष्यभर आंदोलन करु शकत नाही.
आज कॅबिनेट किंवा उपसमितीची बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये त्यांनी निर्णय घ्यावा.
शेवटचे उपोषण सुरेश धस यांनी सोडवले होते. त्यानंतर त्यांनी तीन महिन्यांचा वेळ मागितला होता. त्या तीन महिन्यात काहीच केले नाही.
मुख्यमंत्र्यांचे ओएसडी चर्चेसाठी अंतरवाली सरटीमध्ये दाखल झाले
आता मी चर्चेला कंटाळलो आहे.
आता मराठे घरी झोपले तर जातीचे वाटोळे झाले म्हणून समजा.
सरकारला मुंबईतील आंदोलनाची भीती वाटत आहे
मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले होते की, मराठा आणि कुणबी एक असल्याचे 58 लाख पुरावे मिळाले आहे. त्यामुळे आता त्यांना आरक्षण द्यावेच लागणार आहे.
मुंबईकर मुख्यमंत्र्यांना नाव ठेवायला लागले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री अडचणीत आले आहेत. मुंबईकर आम्हाला नाही तर मुख्यमंत्र्यांना दोष देत आहेत. चार महिन्यांपूर्वी आम्ही त्यांना सांगितले होते की आम्ही 29 ऑगस्टला मुंबईत येणार आहे. त्यांनी एवढ्या दिवसांत काहीच केले नाही.