
जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून…
नवी दिल्ली/ वॉशिंग्टन : अमेरिका आणि भारतामध्ये सध्या टॅरिफवरुन मोठा वाद सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% टॅरिफ लावला आहे.
रशियाकडून तेल खरेदी करत युक्रेनविरुद्धच्या युद्धात भारत रशियाला अप्रत्यक्ष साथ देत असल्याचे ट्रम्प यांचे मत आहे.
दरम्यान या काळात ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ट्रम्प यांचा फोन उचलला नाही, असा दावा जर्मन मासिकाने केला आहे. जर्मन मासिका फ्रॅंकफर्टर ऑलगेमाइनने दावा केला आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना चार वेळा फोन केला होता.
परंतु त्यांनी एकदाही फोन उचलला नाही. पण पंतप्रधान मोदींनी असे का केले? यामध्ये काही धोका आहे का? अशा चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहेत. या दाव्यावर अद्यापर भारताने कोणतीही अधिककृत प्रतिक्रिया देखील दिलेली नाही. या जर्मन मासिकाने याचा भारत आणि अमेरिकेत ऑपरेशन सिंदूर नंतर झालेल्या वादाशी जोडला आहे.
काय आहे एक्सपर्टचे म्हणणे?
तज्ज्ञांच्या मते, सध्या डोनाल्ड ट्रम्प निर्लज्जपणे उपमहाखंडला आपली अर्थव्यवस्था खुली करण्यासाठी असहाय करत आहेत. यामुळे भारताला भूतकाळातील अमेरिकेसोबतच्या कटु संबंधाची आठवण येत असेल.
तसेच एककीडे ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या सुरुवातीच्या काळात पंतप्रधान मोदींचे महान नेता म्हणून कौतुक केले, आता मात्र त्यांचे सूर बदलताना दिसत आहे. नुकतेच पंतप्रधान मोदींना त्यांनी ‘Terrific’ म्हटले आहे.
याशिवाय भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेलाही त्यांनी मृत अर्थव्यवस्था म्हणून घोषित केले आहे. तज्ज्ञांच्या मते, भारतात मध्ये अमेरिकेच्या कृषी कंपन्यांनाही एन्ट्री मिळत नसून हा वाद वाढला असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
ट्रम्प का नाराज आहेत?
डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींवर नाराज दिसून येत आहे. ट्रम्प यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तो उचलला नाही.
तसेच भारत पाकिस्तान युद्धबंदीचे श्रेयही भारताने अमेरिकेला घेऊ दिले नाही. आतापर्यंत ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीचे २० हून अधिक वेळा घेतले आहे.
तसेच रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यास सांगितल्यानंतरही भारताने रशियासोबत व्यापार केला.
शिवाय ट्रम्प यांच्या मते, भारत अमेरिकन उत्पादनांवर सर्वाधिक कर लावतो, या सर्व कारणांवरुन ट्रम्प यांची चिडचिड होताना दिसत आहे.
पंतप्रधान मोदीं का उचलत नाहीत ट्रम्पचा फोन
तज्ज्ञांच्या मते सध्या भारत आपल्या व्यवहारातून कुटनितीक सावधाता साधताना दिसत आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी अमेरिका आणि व्हिएतनामध्ये ट्रेड डिलची घोषण केली होती. यासाठी दोन्ही देशांमध्ये प्रितिनधीमंडळाची गुप्त बैठकही झाली. यावेळी ट्रम्प यांनी व्हिएतनामचे नेते टो लाम यांच्याशी फोनवरुन चर्च केली.
पण कुठल्याही करारांपर्यंत पोहोचण्याआधीच ट्रम्प सोशल मीडिया प्लॅटफॉर्मलर व्यापार कराराची घोषणा करत आहे. एक प्रकारे ट्रम्प दुसऱ्या देशांना अमेरकेशी त्यांच्या अटींप्रमाणे व्यापार करण्यास भाग पाडत आहे, बहुदा याच जाळ्यात पंतप्रधान मोदींना अडकायचे नसले असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.