
भारत आणि चीनबद्दल अत्यंत मोठी बातमी; रविवारी…
तप्रधान नरेंद्र मोदी हे सात वर्षामध्ये पहिल्यांदा चीनच्या दाैऱ्यावर जात आहेत. विशेष म्हणजे ते अशावेळी जात आहेत, ज्यावेळी अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. हेच नाही तर अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफच्या निर्णयात चीनने भारताची साथ दिलीये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात रविवारी व्दिपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी हे शी जिनपिंग यांच्या निमंत्रणानंतर 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या एससीओ शिखर संमेलनात भाग घेणार आहेत.
या बैठकीत दोघांमध्ये टॅरिफबद्दल चर्चा होणार आहे. यादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे देखील चीनमध्ये दाखल होऊ शकतात. अमेरिकेच्या विरोधात भारत, चीन आणि रशिया एकत्र येताना दिसत आहे. हा अत्यंत मोठा धक्का अमेरिकेला म्हणावा लागेल. अगोदर चर्चा होती की, चीनच्या दाैऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील. मात्र, आता स्पष्ट झालंय. भारत, रशिया आणि चीन एकत्र येत असल्याने अमेरिकेने मोठा धसका घेतलाय.
हेच नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या पार्श्वभूमीवर थेट नरेंद्र मोदी यांना चार वेळा फोन केला. मात्र, नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन घेतला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला सातत्याने धमकी दिली जात आहे, हेच नाही तर रशियाकडून भारताने तेल खरेदी करणे बंद केले नाही तर वाईट परिणामांना भारताला आणखीन सामोरे जावे लागेल, असे अमेरिकेकडून सांगण्यात आलंय. मात्र, भारत हा अमेरिकेच्या दबावाला बळी पडताना दिसत नाहीये.
डोनाल्ड ट्रम्प सरकारने नुकताच सांगितले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे. आम्ही त्यांच्यावरील 25 टक्के टॅरिफ कमी करण्यास तयार आहोत. पण आमची रशियाकडून तेल खरेदी न करण्याची अट त्यांना मान्य करावी लागेल. दुसरीकडे रशियाकडून तेल खरेदी करण्यामध्ये चीन सर्वात नंबर एकला आहे. मात्र, असे असतानाही चीनवर टॅरिफ न लावला फक्त भारतावर टॅरिफ लावण्यात आला आहे.