
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझादमैदानावर आंदोलन करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान, माध्यमांशी बोलताना अभ्यासकांशी चर्चा केली आम्ही कोणतीही कागदपत्र देणार नाही.
सरकारने 13 महिन्यांपूर्वी कागदपत्र घेतली असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले. सातारा संस्थानचे आणि हैदराबाद संस्थानचे गॅझेटियरमध्ये संपूर्ण मराठवाडा बसतो असं ते म्हणाले आहेत.
त्याचबरोबर सातारा संस्थानाचे गाझेटियर मराठवाड्यातला मराठा कुणबी असल्याचं सांगतो असं जरांगे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात सरकारला अडथळा असणे शक्य नाही असंही जरांगे म्हणाले. 58 लाख नोंदी आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, ज्यांच्या नाही सापडल्या त्यांची पोट जात घ्या आणि अध्यादेश काढा असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. कुणबी ही उपजात आहे हेच कायदा सांगतो. ओबीसी पात्र करायचं असेल तर पोटजात उपजात म्हणून मराठा कुणबी म्हणून घ्या. सरसकट म्हणायची गरज नाही असंही ते म्हणाले.
फडणवीस साहेब वातावरण थंड ठेवा. पोलीस आमच्या गाड्या अडवत आहेत. आम्ही गावात गेलो तर तुमच्या आमदारांना राज्यात थांबू देणार नाही. राज्यात तुमच्या आमदार खासदारांची अवस्था वाईट होईल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. वाशीत ठाण्यात सुरू असलेले प्रयोग थांबवा. अडवणूक करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा असं जरांगे पाटील म्हणाले. 40 ते 50 पोलिसांनी गळ्यात रुमाल आणि टोपी घालून आमच्या गाड्या अडवत आहेत असंही जरांगे पाटील म्हणाले.
40 ते 50 पोलिसांनी गळ्यात रुमाल आणि टोपी घालून आमच्या गाड्या अडवत आहेत. भगवे रुमाल पोलिसांना घालायची वेळ येईल असं कधी वाटलं नाही असं जरांगे पाटील म्हणाले. महायुतीपासून मराठा समाज बाजूला गेला तर त्यांचा ग्रामपंचायतचा सदस्य देखील येणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले. प्रत्येक वॉर्डात 40 तके 50 टक्के मतदान मराठा समाजाचे असल्याचे जरांगे म्हणाले. मराठ्यांची सरकारला गरज आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर देखील टीका केली. अंगावर एक पण केस नसलेले चिचुंदरी लाल दिसते. मी राणे साहेबांना निलेश साहेबांना काही बोललो का? नारायण राणे आणि निलेश साहेबांनी त्याला समजावून सांगाव, नाहीतर त्याला लाल करणार असा इशाराही त्यांनी दिला.