
शिंदेंच्या आमदाराने राज ठाकरेंना डिवचले !
मराठा आरक्षणावरुन सध्या महाराष्ट्रात राजकारण सुरु आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारत मुंबईत मोठे आंदोलन केले. सलग ५ दिवस चाललेल्या या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांचा मोठा विजय झाला.
मनोज जरांगे यांच्यापुढे सरकारने शरणागती पत्कारत काल सरकारकडून एक जीआर काढण्यात आला. यात राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद गॅझेटचा जीआर हाती पडताच मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे.
भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल महत्त्वाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज ठाकरेंनी आधी लोकप्रतिनिधी होऊन दाखवावे, मग आरक्षणाबद्दल बोलावं, असा खोचक टोला आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी लगावला.
राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर आमदार भोंडेकर यांनी सडेतोड उत्तर दिले. राज ठाकरेंना आरक्षणाबद्दल पुरेशी माहिती नाही. राज ठाकरे यांना आरक्षणाबद्दल खूप काही माहिती नाही. आधी त्यांनी लोकप्रतिनिधी व्हावे, मग आरक्षणासारख्या विषयांवर बोलावे, असे विधान नरेंद्र भोंडेकर यांनी केले.ट
ओबीसीमधून जर आरक्षण मागत असतील तर…
मराठ्यांना आरक्षण हवंय तर द्यावं. मात्र ओबीसीमधून आरक्षण मागत असतील तर तो वाद घालण्याचा प्रकार आहे. वाटल्यास घटनेत दुरुस्ती करायला हवी. परंतु ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये. मनोज जरांगे पाटील यांनी जर मराठ्यांसाठी आरक्षण पाहिजे त्यांना आरक्षण द्यावं. त्याच्यात कोणाचाही आक्षेप नाही. मात्र ओबीसीमधून जर आरक्षण मागत असतील तर एकमेकांमधला वाद लावण्याचा प्रकार करू नये. आधीपासून तिथे खूप सामाज आहेत. त्यांनाच पाहिजे तसा न्याय मिळत नाही. त्यामुळे जरांगे पाटलांना विनंती करायची आहे की वेगळा आरक्षण मागितला पाहिजे, असेही नरेंद्र भोंडकर यांनी म्हटले.
ओबीसी समाजाचा ऑलरेडी बॅकलॉग
वाटल्यास घटनेत दुरुस्ती करायला हवी, तसेच वाटल्यास केंद्राकडे पाठवायला पाहिजे. परंतु ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये. एकाच आपण चांगलं बघतो तर दुसऱ्याचं वाईट बघू नये. ओबीसी समाजाचा ऑलरेडी बॅकलॉग आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी ओबीसीतून आरक्षण न मागता स्वतंत्र आरक्षणाची मागणी करावी असा सल्ला नरेंद्र भोंडकर यांना दिला.,