जगातील सर्वात आनंदी देश म्हणून ओळखला जाणार युरोपीय देश फिनलँड आता भारतीयांसाठी एक खास संधी घेऊन आला आहे.
तुम्हाला फिनलँडमध्ये स्थायिक रहवासी होण्यासाठी खास परवाना मिळवण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. उत्तरेकडील जादुई, Northern Ligts पासून हेलसिंकी शहराजवळील प्रसिद्ध फिनलँडमध्ये तुम्हाला स्थायिक होता येणार आहे. तसेच सुरक्षित आणि समाधानकारक आयुष्याची देखील हमी तुम्हाला मिळेल.
सध्या फिनलँडकडून भारताला A-Type चा परवाना दिला जातो, पण आता तुम्हाला PR साठी अप्लाय करता येईल. तुम्हाला फिनलँडमध्ये राहून ४ वर्षे झाले असल्यास तुम्ही कायमस्वरुपी स्थायिक होण्यासाठी अर्ज करु शकता. जानेवारी २०२६ पासून हा अर्ज सुरु होणार असून तुम्हाला जवळपास सहा वर्षे फिनलँडमध्ये राहता येईल.
अर्जासाठी पात्रता अटी
तुम्हाला फिनलँडचा कायमस्वरुपी रहिवासी परवाना मिळवायचा असेल तर तुमच्याकडे चार वर्षांचा A-Type रहिवासी परवाना असणे आवश्यक आहे.
तसेच तुम्हाला फिनलँडमध्ये प्रत्यक्षात दोन वर्षे रहावे लागणार आहे.
तुम्हाला देशाबाहेरील प्रवासाची सर्व माहिती हवी
तसेच तुमच वार्षिक उत्पन्न हे ४० हजार युरो म्हणजेच ४१.३ लाख पेक्षा जास्त असावे.
यााशिवाय तुमच्याकडे मान्यताप्राम्त पदव्युत्तर पदवी आणि दोन वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
तसेच तुम्हाला फिनिश किंवा स्वीडिश भाषेचा C1-Level यायला हवी, आणि तीन वर्षाच्या नोकरीचा अनुभव हवा.
तसेच अर्जदाराचा कणताही गुन्हेगारीचा रेकॉर्ड नसवा.
कसा कराल अर्ज आणि खर्च
अर्ज करण्यासाठी सुरुवातील सर्व पात्रता कागदपत्रे गोळा करा.
नंतर Enter Finland पोर्टलवर ऑनलाईन फॉर्म भरा.
ऑनलाईन अर्जासाठी २४० युरो म्हणजे भारतीय रुपयांमध्ये २४,८०० तुम्हाला भारावेल लादली.
तुम्ही प्रत्यक्षातही अर्ज भरु शकता, यासाठी तुम्हाला ३५० युरो म्हणजे ३६,१००० रुपये आणि १८ वर्षाखालील मुलांसाठी १८० युरो म्हणजे १८,६०० रुपये भरावे लागतील.
तसेच बायोमेट्रिकही करण्यासाठी फिनलँड इमिग्रेशन सेवा केंद्र किंवा VFS Gobal मध्ये अपॉइंटमेंट घ्या.
यानंतर तुम्हाला मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला दूतावासाकडून रहिवासी कार्ड घेता येईल.
काय आहेत रहिवासी परवान्याचे फायदे
फिनलँडमध्ये रहिवासी परवाना मिळाल्यानंतर अनिश्चित कालावधीसाठी राहता येईल, तुम्हा नोकरी करता येईल.
कुटुंबाल स्पॉन्सर करुन फिनलँडमध्ये घेऊन जाण्याचा अधिकारही मिळेल.
तसेच तेथील सामिजाक सुरक्षा, आरोग्यसेवा, शिक्षण, पेन्शन योजना, घरासाठी अनुदान, बेरोजगारी भत्ता, कर्ज या सुविधांचा लाभ घेता येईल.
फिनलँडच्या या रहिवासी परवानामुळे भारतीयांना युरोपमध्ये स्थिर, सुरक्षित आणि उच्च शैलीच्या जीवनाचा अनुभव घेता येईल.
