पाकिस्तानी सैन्याच्या बड्या अधिकाऱ्याने दिली सर्वात मोठी कबुली !
आम्ही भारतासोबत शस्त्रास्त्रांच्या शर्यतीत नाही असं पाकिस्तानचे DG ISPR (डायरेक्ट जनरल ऑफ इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशंस) लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी म्हटलं आहे.पाकिस्तानी सैन्यातील ते दुसरे मोठे अधिकारी आहेत.
भारताच्या तुलनेत पाकिस्तानी सैन्याचं बजेट हे एका छोट्या भागासमान आहे. आमच्याकडे अनलिमिटेड पैशांची लक्जरी नाहीय. आम्ही सर्व प्रकारची टेक्नोलॉजी मिळवण्यासाठी तयार आहोत, असं जनरल चौधरी म्हणाले. मग, ती टेक्नोलॉजी पूर्वेकडच्या देशांकडून मिळो किंवा पश्चिमेकडेच्या. पाकिस्तान आपल्या सैन्य क्षमतांचा विकास संतुलित आणि प्रभावी पद्धतीने करतोय. पाकिस्तानने मागच्यावर्षी संरक्षणावर 10.2 अब्ज डॉलर (8,517 कोटी रुपये) तेच भारताने 86.1 अब्ज डॉलर (7,587.13 अब्ज रुपये) खर्च केले.
भारताचं डिफेंस बजेट पाकिस्तानपेक्षा खूप जास्त आहे. देशाचं आकारमान आणि रणनितीक प्राथमिकता त्यातून दिसून येते. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टीट्यूटच्या (SIPRI) आंकड्यांनुसार, 2024-25 साठी भारताचं बजेट 86.1 अब्ज डॉलर होतं. तेच पाकिस्तानच बजेट 10.2 अब्ज डॉलर होतं. भारत डिफेंस बजेटच्या बाबतीत जगात पाचव्या स्थानावर आहे.
10 वर्षात भारताच्या सैन्य बजेटचा आकडा किती वाढला?
भारत आपली स्थिती मजबूत करण्यासाठी सैन्याच्या आधुनिकीकरणामध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. दुसरीकडे पाकिस्तान आपल्या सैन्य गरजा पूर्ण करण्याच्या मागे लागला आहे. मागच्या एक दशकात भारताच डिफेंस बजेट जवळपास दुप्पट झालं आहे. 2013 साली भारताचा सैन्य खर्च 41 बिलियन डॉलर होतं. 2024 मध्ये हाच आकडा 80 बिलियन डॉलर झाला.
पाकिस्तान चीनकडून किती टक्के शस्त्रांची खरेदी करतो?
पाकिस्तानला चीनकडून सर्वाधिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा होता. चीन पाकिस्तानच्या गरजेनुसार त्यांना 80 टक्के शस्त्रास्त्रांचा पुरवठा करतो. चीनची J-10C, JF-17 ही फायटरं विमानं, टाइप 054A/P फ्रिगेट्स, HQ-9 आणि HQ-16 एअर डिफेंस सिस्टिम, ड्रोन्स आणि मिसाइल्स पाकिस्तानकडे आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान या सर्व चिनी माल भारताच्या अचूक, भेदक अस्त्रांसमोर फेल ठरला होता. इंडियन एअर फोर्सचे एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह म्हणालेले की, ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने पाकिस्तानी F-16 आणि JF-17 फायटर विमानं पाडलेली. एक C-130 ट्रान्सपोर्ट विमानही पाडलेलं. इंडियन एअर फोर्सच्या अचूक हवाई हल्ल्यांमुळे पाकिस्तानला हे नुकसान सहन करावं लागलं.
