मृणाल बापूसाहेब कांबळे यांचा जनसंपर्क वाढतोय; मतदारांमध्ये विश्वासाची लाट !
पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२-अ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युतीचे अधिकृत उमेदवार मृणाल बापूसाहेब कांबळे हे प्रभागातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत.
सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांची सखोल जाण आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची स्पष्ट भूमिका यामुळे मृणाल कांबळे यांच्याविषयी मतदारांमध्ये विश्वास वाढताना दिसत आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि महिलांच्या सक्षमीकरणावर त्यांचा ठाम भर आहे.
प्रचारादरम्यान त्यांनी “राजकारण नव्हे, सेवा” हा दृष्टिकोन मांडत नागरिकांच्या दैनंदिन अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे विविध समाजघटकांमध्ये त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, बदलाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
भाजपा–आरपीआय युतीच्या संघटनात्मक ताकदीसोबतच मृणाल बापूसाहेब कांबळे यांची स्वच्छ प्रतिमा, संयमी नेतृत्व आणि काम करण्याची तयारी हे मुद्दे मतदारांना भावताना दिसत आहेत. “काम करणारा प्रतिनिधी हवा” ही भावना प्रभाग २२-अ मध्ये अधिक बळावत चालली आहे.
आगामी निवडणुकीत कमळ चिन्हावर मतदान करून विकासाला संधी द्यावी, असे आवाहन नागरिकांमध्ये आपोआप चर्चेत येत असून, प्रभाग २२-अ मध्ये यावेळी उमदेवार आपलीच ताई विजय होणार अशी जनसामान्यांचे भावना आहे.
