ठाणे- मा. वरिष्ठांचे आदेशाने आगामी मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने दि. ०१/०१/२०२६ रोजी परि. २, भिवंडी हद्दीत गुन्हे शाखा घटक २, भिवंडी येथील अधिकारी व अंमलदार गुन्हेगार वॉच पेट्रोलींग करीत असताना पोशि/विजय कुंभार यांना बातमी मिळाली की, “दोन टेम्पो नं. एम.एच. ०४ एल.ई ३९१० व टेम्पो नं. एम.एच. ०४ एम.आर. ३३९१ यामधुन अवैध प्रतिबंधीत अन्नपदार्थ गुटखा असा माल भादवड नाक्याकडुन कल्याण नाका दिशेला घेवुन येणार आहे.” अशी बातमी मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शितल राऊत यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे सपोनि/श्रीराज माळी, सपोनि/मिथुन भोईर, पोउनि/रविंद्र बी. पाटील यांनी पथकासह आसबीबी मश्जिदसमोर, रोडवर, भिवंडी या ठिकाणी सापळा रचुन आरोपी १) टाटा इन्ट्रा टेम्पो नं. एम.एच. ०४- एल.ई ३९१० यावरील चालक गणेश संजय मरकर २) महिंद्रा विरो टेम्पो नं. एम.एच. ०४ – एम.आर. ३३९१ या वरील चालक अक्षय सदाशिव गुडेकर तसेच ३) आयशर कंपनीचा टेम्पो नं. डी.डी. ०१ एफ. ९१०२ वरील चालक अजिम वहीद शेख यांना पंचासमक्ष ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील टेम्पोमध्ये ५४,९९,०००/- रू. किमतीचा गुटखा व ३ टेम्पो असा एकुण ७७,९९,०००/- रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर आरोपी यांच्याविरुद्ध भिवंडी शहर पोलीस ठाणे, भिवंडी गुन्हा रजि. नं. ०४/२०२६, अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६, मधील कलम २६ (२) (1) सहवाचन कलम ३ (१) (zz) (v) शिक्षा कलम ५९ तसेच कलम २६ (२) (IV) सहवाचन अन्न सुरक्षा आयुक्त यांचे दि. २० जुलै २०१८ चे आदेश, कलम २७ (३) (d) कलम २७ (३) (९) शिक्षा कलम ५९ नुसार सह भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २२३, २७४, २७५, १२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि/श्रीराज माळी, गुन्हे शाखा, घटक २ भिवंडी हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे ठाणे शहर, व श्री. शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शोध १, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक- २ भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शितल राऊत, सपोनि /श्रीराज माळी, सपोनि/मिथुन भोईर, पोउनि / रविंद्र बी. पाटील, सपोउनि/सुनिल साळुंके, सपोउनि /सुधाकर चौधरी, पोहवा / निलेश बोरसे, सुदेश घाग, शशिकांत यादव, प्रकाश पाटील, वामन भोईर, वसंत चौरे, साबीर शेख, मपोहवा / माया डोंगरे, ७४९४ सायली गंभेरा, पोशि/अमोल इंगळे, विजय कुंभार, भावेश घरत, नितीन नंदीवाले, सर्फराज तडवी यांनी केली आहे.
