दैनिक चालु वार्ता रत्नागिरी प्रतिनिधी -समिर शिरवडकर
राजापूर’:- माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सन्मा.सुभाष बसवेकर आणि महाराष्ट्र सचिव समिर शिरवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रातभरात भ्रष्टाचाराचा समुळ नायनाट करण्यासाठी सज्ज आहेत,त्यातील एक भाग म्हणजे राजापूर तालुक्यातील तीन अपत्य बाबतीत राजापूर मधील माहिती अधिकार महासंघ राजापूर सह सचिव रुपेंद्र विलास कोठारकर ( रुपेश) यांनी काही महिन्यांपूर्वी दि.२७/१२/२४ रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना राजापूर मधील कार्यरत अंगणवाडी सेविका/मिनी अंगणवाडी सेविका/आणि मदतनीस यांच्या तीन अपत्य बाबत शासन परिपत्रक एम.आर.व्ही.२००४ प्र.क्र.१७/२००० दि.२८ मार्च २००५ नुसार माहीती अधिकारात माहिती मागविली होती.
त्यानुसार,समंदीत विभागाने चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी सूचित केले होते.त्याप्रमाणे पर्यवेक्षिका धारतळे यांनी दि.१५/०१/२५ रोजी राजापूर प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या धारतळे बिट मध्ये एकूण ४८ अंगणवाडी कार्यरत असून ४८ अंगणवाडी सेविका असून २५ मदतनीस आहेत.तरी १३ ऑगस्ट २०१४ नंतर बिट मधिल सर्व कर्मचारी ची चौकशी केली असता,एका सेविकेला श्रीमती संचिता सुनील हळदणकर यांना अपत्य क्र.१-०६/०४/१२,क्र.२-१५-०४/१४ आणि ,क्र.३- ३०/१२/२३ अश्या प्रकारे तिसरे अपत्य ऑगस्ट २०१४ नंतर चे आहे असा अहवाल बालविकास प्रकल्प अधिकारी राजापूर याना देण्यात आला होता.
सदर, अहवालानुसार बालविकास प्रकल्प अधिकारी राजापूर यांनी श्रीमती संचिता सुनील हळदणकर यांना लहान कुटुंब बाबत खुलासा बाबत पत्र दिले असून, ते पत्र त्यांनी स्वीकारले नाही.त्यानंतर सुद्धा कोठारकर यांनी याच बाबतीत पुन्हा माहिती विचारली असता,तीन अपत्य बाबत आपण या कार्यालयाला आपल्या पर्यवेक्षिका मार्फत सात दिवसाच्या आत आपले म्हणणे सादर करावे,अन्यथा,आपले काही म्हणणे नाही असे समजून १३ ऑगस्ट २०१४ प्रमाणे कारवाई करण्यात येईल अश्या आशयाचे पत्र दि.२९/०१/२०२५ दिले होते.
सदर, प्रकरणी संचिता हळदणकर यांनी कोणत्याही प्रकारची माहिती किव्हा आपले लेखी म्हणणं सादर केले नसल्याने बालविकास प्रकल्प अधिकारी आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती राजापूर यांनी दि.१८/११/२५ रोजी अंगणवाडी सेविका साठी लहान कुटुंब ही अट लागू असल्याने त्या नियमानुसार तिसरे अपत्य झाले असल्यास सेवेतून कार्यमुक्त करावे असे स्पष्ट आदेश आहेत,त्याप्रमाणे शासन निर्णय क्र. ए ब व्ही २०१२/प्र.क्र.४२९/का-६-दि.१३ ऑगस्ट १४ नुसार श्रीमती संचिता हळदणकर वाडातीवरे ता.राजापूर अंगणवाडी सेविका यांच्याकडील संपूर्ण कार्यभार काढून श्रीमती समीक्षा समीर सातुर्डेकर मदतनिस राजवाडी तिवरे यांच्याकडे देऊन कार्यमुक्त होणेचे आहे असा आदेश जा.क्र.अंगणवाडी/सेवासमाप्ती/७०७/२०२५ दि.१८/११/२५ रोजी दिला आहे.
