दिवा – ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी दिवा प्रभाग समितीच्या प्रभाग क्रमांक 27 आणि 28 मध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दिवा शहरातल्या सत्ताधारी शिवसेना शिंदे गटासमोर २७ (अ) मध्ये केवळ १ मात्र उमेदवार राहिला, तर प्रभाग २८(क) मध्ये देखील १ मात्र उमेदवार ठाम उभा असल्याचे पहायला मिळाले , या २ ठिकाणच्या सर्वच अपक्ष इच्छुक उमेदवारांपैकी सर्वांनीच आपली उमेदवारी मागे घेतल्याने दिवा शहरातील जाणकारांनी या जागांवर शिंदेची सेना बिनविरोध निवडून येणार असे अंदाज लावत असतानाच, अर्ज मागे घेण्याची कमाल मर्यादा संपली आणि या दोन जागेसाठी
“निष्ठावंतांसमोर पैसेवाल्यांची डाळ शिजली नाही”
“दिवा शहर बिनविरोध मिशन फेल”
सत्ताधारी पक्षाला असा उपरोधक टोला लागावणारी पोस्ट सोशल मिडीयवार प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रभाग क्रं.२७(अ) आणि २८(क) मध्ये
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
विरुद्ध
शिवसेना (शिंदे गट)
अशी थेट लढत.
