दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड/प्रेम सावंत
गंगाखेड: शहरातील द रॉयल अकॅडमीची विद्यार्थिनी तथा इसाद गावची पहिली कन्या कुमारी संध्या गोपीनाथराव भोसले हिने भारतीय अर्धसैनिक दलातील केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) निवड होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, या निकालात गंगाखेड शहरासह परिसरातील पहिली महिला सैन्य दलात दाखल होण्याचा मान संध्या गोपीनाथराव भोसले यांनी मिळवला असून, हा संपूर्ण परिसरासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.
ग्रामीण भागातून येऊन देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या संध्या भोसले हिने सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. तिच्या या ऐतिहासिक यशामुळे इसाद गावासह गंगाखेड तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
🔹BOX LINE:🔹 *इसाद गावची पहिली कन्या संध्या गोपीनाथराव भोसले हिने केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) निवड होऊन गंगाखेड पंचक्रोशीचा मान उंचावला असल्याचे द रॉयल अकॅडमीचे संचालक कचरे सर यांनी दै.चालु वार्ताशी बोलतांना सांगितले*
या उल्लेखनीय यशाबद्दल द रॉयल अकॅडमीचे संचालक रावसाहेब कचरे सर, आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथजी सातपुते, लॉयन्स क्लब टाऊनचे संस्थापक अध्यक्ष केशवराव देशमुख, लॉयन्स क्लब टाऊनचे अध्यक्ष ॲड. रावसाहेब वडकिले, तसेच भारतीय वायू दलात कार्यरत रवी किरण घाडगे पाटील यांच्यासह आदींनी संध्या भोसले यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
संध्या भोसले यांच्या निवडीमुळे ग्रामीण भागातील मुलींना प्रेरणा मिळाली असून, तिचे यश हे इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते याचे जिवंत उदाहरण मानले जात आहे. इसाद गावासह संपूर्ण तालुक्यातून संध्या भोसले यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
