इगतपुरी प्रतिनिधी :- विकास पुणेकर
इगतपुरी :- दि.२० जानेवारी, २०२६ इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात ‘भुगोल दिना’ निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. प्रमुख अतिथी तथा व्याख्याते म्हणून डॉ.राजेंद्र गुंजाळ केटीएचएम महाविद्यालय नाशिक हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.किरण रकीबे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डाॅ.रकिबे यांनी भूगोल व मानवाचा मुलभूत संबंध, जागतक तापमान वाढ, पर्यावरण, प्रदूषण, इ. घटकावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ.राजेंद्र गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना भूगोल विषयात करिअरवर असलेल्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. भूगोल विभाग प्रमुख उत्तम सांगळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून भूगोल दिन साजरा करण्याचा उद्देश, तसेच आपल्या हिंदू धर्मात मकरसंक्रांतीचे भौगोलिक महत्व विषद केले. या उपक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कल्पना कोताडे तर आभारप्रदर्शन नवनाथ बोंबले यांनी केले.
