दै. चालू वार्ता वृत्तसेवा उमरखेड तालुका प्रतिनिधी/प्रवीण कनवाळे –
पंचायत समिती उमरखेड अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कळमुला येथे दिनांक २० जानेवारी रोजी पालकसभेचे आयोजन करण्यात आले या सभेत शाळा व्यवस्थापन समिती चे पुनर्गठन करण्यात आले.
सदर पालक सभेत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रामेश्वर धोंडबाराव कनवाळे तर उपाध्यक्षपदी शामराव काशिनाथ कनवाळे यांची फेर निवड करण्यात आली तर सदस्य पदी किरण कनवाळे, गजानन शिंदे, यवणेश्वर इंगळे, प्रकाश कनवाळे, सौ.अर्चना खंडाळे, सौ.ज्योती हुपाडे,सौ.उज्वला धुळे तर शिक्षणप्रेमी सदस्य प्रवीण कनवाळे, ग्रामपंचायत प्रतिनिधी शंकर काळे, विध्यार्थी प्रतिनिधी कु. कोमल घाटे व अमर हुपाडे, शिक्षक प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी आणि समिती सचिव म्हणून मुख्याध्यापक कु. शितल तिडके यांची अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद शाळा कळमुला शाळेने अल्पअवधीत सर्व शालेय नियोजन, विध्यार्थी वाढ, विविध शैक्षणिक उपक्रम,विशेष विध्यार्थी लक्ष व अथक परिश्रम शाळा व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षक वर्ग यांनी घेत तालुक्यात नावलौकिक मिळवले यांचे सर्व पालकांनी व उपस्थित नागरिकांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले,
यावेळी उपस्थित सर्व पालकांनी व ग्रामस्थांनी नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीचे शालश्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले,
यावेळी कळमुला येथील प्रतिष्ठित नागरिक व सर्व पालकवर्ग उपस्थित होते, सदर पालक सभेचे संचलन शिक्षक विशाल सूर्यवंशी तर आभार शिक्षिका कु.चंद्रकला जाधव यांनी मानले.
