■ समिर शिरवडकर-रत्नागिरी
जैतापूर :- रत्नागिरी, पावस, नाटे, विजयदुर्ग या सागरी महामार्ग वरील निसर्ग रम्य अश्या श्री देव वेताळ यांच्या पावनभूमीत दरवर्षी प्रमाणे जैतापूर प्रीमियम लिग जैतापूर आयोजित भव्य नाइट क्रिकेट सामन्याचा शुभारंभ सुप्रसिद्ध अश्या लाला मैदान या ठिकाणी दि.१९-०१-२६ रोजी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
भव्य आकर्षक बक्षिसे आणि प्रथम पारितोषिक रु.४४,४४४/- तर द्वितीय पारितोषिक २२,२२२/- असून यात १६ टीम खेळल्या जाणार आहेत. या जे.पी.एल च्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण युट्यूब द्वारे प्रसारीत होणार असून, सर्व परिसतारील, क्रीडा रसिक प्रेक्षकांना याचा आस्वाद घ्यावा असे अवाहन जे. पी. एल चे अध्यक्ष शरफुद्दीन काझी, उपाध्यक्ष श्रीकृष्ण राऊत, आणि सल्लागार गिरीष करगुटकर यांनी केले आहे.
