मंडणगड प्रतिनिधी श्री .उमेश तबीब
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह दिनानिमित्त शाळेत आर एस पी च्या विद्यार्थ्यांनी आपले वाहतुकीचे नियम व त्याचे प्रात्यक्षिक सादर केले. संस्थेचे चेअरमन माननीय श्री कुलदीप मुकुंद करमरकर यांच्या प्रेरणेने व शाळेचे मुख्याध्यापक श्री भोकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. आर एस पी विषयाचे प्रमुख शिक्षक श्री. भागवत बालाजी श्रीमंगले यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक व रस्ता सुरक्षा याबद्दल माहिती सांगून प्रोत्साहित केले. यामध्ये आर एस पी विषयाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. तसेच शाळेतील शिक्षक सौ भोकरे मॅडम व श्री जाधव सर व श्री मोहिते मॅडम व श्री कोकिळ मॅडम तसेच शिक्षकेतर कर्मचारी सौ भाटे मॅडम व श्री पड्याळ यांनी सहभाग घेतला. आर एस पी च्या विद्यार्थ्यांनी वाहन चालकांना वाहतुकीचे नियम तसेच सुरक्षितता याबद्दल जागृत केले. व त्यांना शुभेच्छा दिल्या.
