गडचिरोली-विजय शेडमाके.
गडचिरोली:+गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातही प्रगत वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हेडरी येथील लाईट्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये वेळेवर व अत्याधुनिक क्रिटिकल केअर उपचारामुळे एका मध्यमवहीन महिलेचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
पार्सल गुंडी गावातील ही महिला ऑरगॅनो फॉस्फरस विषबाधेमुळे अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल झाली डिसेंबर २०२५ रोजी रुग्णालय बेशुद्ध अवस्था तीव्र श्वसनास त्रास आणि फुसफुसातील गंभीर गुंतागुंतीसह रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टर आणि परिस्थितीची गंभीरता ओळखून तात्काळ आपत्कालीन जीवनरक्षक उपचार सुरू केले. रुग्णांना ईट्युबेट करून आय सी यु मध्ये दाखल करण्यात आले. आणि मेकॅनिकल व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले. दीर्घकाळ व्हेंटिलेटर वर राहावे लागल्याने पुढे ट्रेकिओस्टामि करावी लागली. रुग्ण तब्बल १५ दिवस आय सी यु मध्ये उपचाराखाली होती. या काळात विषबादीच्या परिणाम मेंदू हृदय आणि फुसफुसावर झाला, तिला तीव्र फसफुसातील सूज (Acute pulmonary Edima) आली तसेच सुप्रोह्टीक्यूलर टँकीकारडिया (SVT) चे दोन झटके आले. ज्यामुळे तिची प्रकृती अधिकच गंभीर झाली. मातृ डॉक्टर दिसत निरीक्षण आधुनिक उपकरणे आणि समन्वयीत उपचारामुळे रुग्णांने हळूहळू उपचारांना प्रतिसाद दिला. भाऊ वैद्यकीय तज्ञाच्या अथक प्रयत्नामुळे रुग्णांना यशस्वीरित्या व्हेंटिलेटर वरून काढण्यात आले. या उपचाराचे नेतृत्व मेडिसिन तज्ञ डॉक्टर चेतन, भूलतज्ञ डॉक्टर धीरज आणि इ एन टी तज्ञ डॉक्टर महेंद्र यांनी केले. तर संपूर्ण उपचार प्रक्रिया वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गोपाल रॉय, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रुग्णालय प्रशासनाने एल एम इ एल चे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांचे गडचिरोली सारख्या दुर्गम भागात अत्याधुनिक क्रिटिकल केअर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. तसेच संचालिका श्रीमती कीर्ती रेड्डी, यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा संपूर्ण प्रकार म्हणजे, वेळेवर उपचार आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि समर्पित डॉक्टरांच्या टीमवर्कमुळे दुर्गम भागातील रुग्णांचे प्राण वाचवता येतात याचे जिवंत उदाहरण आहे.
