दैनिक चालु वार्ता न्युज नेटवर्क- जिवन जाधव
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक म्हणून ओळख असलेले शिवदूत विलास काळे यांचा कारला पंचायत समिती गणात बोलबाला ,
औसा :आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून, लातूर जिल्ह्यातील खरोसा जिल्हा परिषद गणातून निवडणूक लढवण्यासाठी अनेक दिग्गजांनी कंबर कसली आहे. यामध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा कडवट शिवसैनिक मनुन ओळख असलेले विलास काळे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने या गणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
विलास काळे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून खरोसा जिल्हा परीषद गटासह कारला गणातील व परिसरातील गावांमधील सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शिक्षण, आरोग्य आणि शेतकरी विषयक समस्या, उस उत्पादक शेतकर्यांच्या अडचणी सोडवत , सामान्य गोरगरीब नागरिकांच्या समस्या, परिसरातील युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेत, परिसरातील अनेक गावच्या शेतकरी .कष्टकरी व सर्वसमावेशक असलेल्या ग्रामस्थांनी विलास काळे यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह केला होता.जनतेच्या आग्रहास्तव निवडणुक लढवण्यावर ठाम असलेले शिवसेनेचा निष्ठावंत शिवदुत विलास काळे यांनी जनसंपर्कावर दिला भर दीला असुन ,
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच विलास काळे यांनी कारला गणातील प्रत्येक गावात जाऊन गाव गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. तरुणांचे संघटन आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद घेत त्यांनी आपला प्रचार सुरू केला असून, विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले आहे.
कारला गणातील रखडलेले रस्ते, पाणीप्रश्न आणि शेतीविषयक समस्या प्राधान्याने सोडवणार असल्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले आहे. विलास काळे यांच्या उमेदवारीमुळे या गणात आता शिवसेनेची ताकद असल्याने व सर्वसामान्यांचा असल्याने
श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून काम करत असताना खरोसा जिल्हा परिषद गटातील अनेक गावातील ऊस उत्पादकांना त्यांचा उस वेळेवर तोडणी करून दिलासा देण्याचं काम विलास काळे यांनी केलं आहे
हिंदुत्वाचं भगवं वादळ कारला पंचायत समिती गणात चालेल का याचीच मतदारसंघात चर्चा असून विलास काळे यांचा दांडगा जनसंपर्क पाहता शिवसेनेची मशाल कारला गणात पेठनार अस सर्वसामान्यातुन बोलल जातय
