प्रतिनिधी वाशिम
लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाकडून गौरव; संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याची प्रक्रिया नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. सत्य, निर्भीडता आणि लोकहिताची भूमिका जपत कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी केले.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनी सामाजिक प्रश्नांवर निर्भयपणे आवाज उठवावा, तसेच नैतिक मूल्यांची जोपासना करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
“तुफानो से आख मिलाओ, सैलाबो पर वार करो… मल्लाहो का चक्कर छोडो, तेर के दरिया पार करो” — या विचारांप्रमाणे पत्रकारांनी कोणत्याही दबावाला न झुकता सत्यासाठी लढत राहावे, असेही त्यांनी सूचित केले.
यावेळी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय व प्रभावी कार्य केल्याबद्दल मा. प्रताप नागरे (दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी, वाशिम) यांना लोक स्वातंत्र पत्रकार महासंघाच्या वतीने अकोला येथे ‘लोक स्वातंत्र प्रभावी पत्रकारिता गौरव’ राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा सन्मान संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांच्या हस्ते गौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला.
सामाजिक प्रश्न, प्रशासनातील त्रुटी तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडत पत्रकारितेच्या माध्यमातून जनहिताचा आवाज सातत्याने बुलंद केल्याबद्दल मा. प्रताप नागरे यांच्या कार्याची यावेळी विशेष दखल घेण्यात आली.
या प्रसंगी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मान्यवर, वरिष्ठ पत्रकार, वरिष्ठ पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे पत्रकारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, समाजहितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
