जळगाव जामोद प्रतिनिधी (विनोद वानखडे)
रथसप्तमीच्या पवित्र मुहूर्तावर दि.25 जानेवारी 2026 ला श्री बेंबळेश्वर मंदिर जामोद येथे हळदी कुंकू व कुटुंब प्रबोधनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून ज्योतीताई धंदर (महाराष्ट्र पोलीस) यांनी कुटुंब प्रबोधन यावर मोलाचे मार्गदर्शन केले.त्या बोलताना म्हणाल्या लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा स्वतःला ओळखा, स्वच्छंदी जगायला शिका. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ.सुचिता ताई उमाळे यांचे महिलांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.सोशल मीडियाच्या सुप्रसिद्ध रीलस्टार सौ. शीतलताई सचिन बावणे यांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढविली.सौ. उषाताई धुर्डे, सौ.सरस्वतीबाई दामधर, सौ.कविताताई हांडे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या. सौ.प्रियाताई हागे यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाची सुरुवात केली तर सूत्रसंचालन सौ.शालिनीताई धुर्डे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी सौ.आशा समाधान डाबेराव,सौ.प्रिया सचिन हागे,सौ.शालिनी अरविंद धुर्डे सौ.सविता गोपाल घाटे,सौ.अनिता किसन ताथरकार यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाला गावातील शेकडो महिलांची उपस्थिती होती. सर्व महिलांना हळदीकुंकू लावुन सौभाग्याचे वान देण्यात आले. महिलांनी मजेशीर उखाणे घेत आनंद व्यक्त केला. शेवटी सर्वांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली.
