दै.चालू वार्ता प्रतिनिधी :युवराज अडसुळे
दादर, चैत्यभूमी : 26 जानेवारी ही फक्त सुट्टी नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले सर्वोत्तम गिफ्ट आहे या देशातील हजारो वर्षाच्या गुलामगिरी ला संविधान रुपी हत्यार देऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता, निर्माण केलेल्या अधिकाराचा दिवस, संविधानाचा दिवस, आपल्या हक्काचा दिवस हा जल्लोषात चं साजरा झाला पाहिजे, ही मूल्ये माणसं घडवतात. 1917 च्या काळात ब्रिटिश असा दृष्टीकोण बाळगून होते कि, भारत हा देश लोकशाही साठी सोयीस्कर च नाही, अशा काळात डॉ. आंबेडकरांनी इंग्रजांशी संघर्ष करून या देशात “लोकशाही” पेरली अशी लोकशाही जी लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य उभं करतं. या देशांच्या संविधानात सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी बसवले. आणि या देशाला लोकसत्ताक गणराज्य दिले. भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविक मध्ये “आम्ही भारताचे लोकं” अशी बांधणी करून आमचे अस्तिव उभं केलं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून फक्त “मावळा” शब्द दिला तसेच भारतीय संविधानाने फक्त “भारतीय” म्हणून जगात ओळख दिली. म्हणून आजच्या शुभ प्रसंगी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति आपण माणूस म्हणून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.
