विजयकुमार जेठे खेड तालुका प्रतिनिधी -:
नाशिक येथील परेड मैदानावर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री मा. गिरीश महाजन यांनी भाषण केले.
मात्र या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव उल्लेखले गेले नाही.
ही बाब अत्यंत गंभीर व निषेधार्ह असल्याचा आरोप स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेने केला आहे.
संविधान दिन असो वा प्रजासत्ताक दिन, डॉ. आंबेडकरांचे योगदान स्मरणात ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे संघटनेने म्हटले आहे.
त्यांच्या नावाचा उल्लेख टाळणे म्हणजे संविधानाच्या मूल्यांचा अवमान असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर खेड राजगुरुनगर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे निषेध नोंदविण्यात आला.
खेड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मा. प्रदीपसिंग सिसोदे साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आले.
निवेदनात आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्याचे नमूद करण्यात आले आहे.
भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये, अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे.
संविधान निर्मात्यांचा योग्य सन्मान राखावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या वेळी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष मा. हरेशभाई देखणे उपस्थित होते.
महासभेचे प्रवक्ता मा. ईश्वर इंगळे सर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
खेड तालुका संपर्क प्रमुख मा. हरीशभाऊ कांबळे यांनी निषेध व्यक्त केला.
सामाजिक कार्यकर्ते कैलासभाऊ केदारी यांचीही उपस्थिती होती.
मा. भाऊसाहेब वाईदंडे यांनी संविधान मूल्यांवर भाष्य केले.
राज्य सदस्य मा. अलकाताई गुंजाळ यांनी संघटनेची भूमिका मांडली.
IT सेल अध्यक्ष मा. सोनुभाऊ काळे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.
समस्त महिला भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घटनेविरोधात संघटनेने शांततामय व लोकशाही मार्गाने निषेध नोंदविला.
संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान अबाधित राहावा, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे.
