ठाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी,विकी जाधव.
इको चालक–मालकांवर होत असलेल्या अन्याय, शोषण आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार करत श्रमजीवी रयत कामगार संघटनेच्या वतीने मंगळवार, दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी अंबाडी–पारोल–शिरसाड येथे इको युनियन बोर्डाचे उत्साहात अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमातून इको चालकांच्या संघटनात्मक शक्तीचे ठोस प्रदर्शन झाले.
कार्यक्रमात कामगार संघटनेच्या संघटक सचिव ॲड. उज्वला माळी यांनी ठाम भूमिका मांडत, “इको चालकांना न्याय मिळेपर्यंत संघटना स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा दिला. तर जिल्हा उपाध्यक्ष सागर देसक यांनी, “कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास संघटना रस्त्यावर उतरून संघर्ष करेल,” असे स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला भिवंडी ग्रामीण संघटना तालुका अध्यक्ष आशा भोईर, तालुका सचिव विश्वनाथ पासारी, माजी भिवंडी कामगार संघटना तालुका अध्यक्ष महेंद्र निरगुडा, माजी तालुका उपाध्यक्ष लक्ष्मी मुकणे, सल्लागार प्रदीप मांजरेकर, मंदा सवर, राजेश ठाकूर तसेच २४ इको चालक–मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी इको युनियन कमिटी अध्यक्ष रोहिदास पराडे, उपाध्यक्ष प्रदीप वंजारी, दत्ता बसवंत, सचिव सुरेश सोनार, खुशाल धामोडे, खजिनदार नीलेश पाटील, दीपक बसवंत आणि सल्लागार मनोज गायकर यांनी संघटनेची ध्येयधोरणे मांडत चालक–मालकांनी संघटित राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात इको चालकांचे हक्क, सुरक्षितता, दरवाढीचे प्रश्न, दंडात्मक कारवाई तसेच प्रशासनाच्या जाचक धोरणांविरोधात श्रमजीवी रयत कामगार संघटना निर्णायक संघर्ष छेडणार असल्याचा ठाम इशारा देण्यात आला.
“हा बोर्ड अनावरण म्हणजे केवळ फलक नसून, इको चालकांच्या न्यायासाठी उभारलेले संघर्षाचे रणशिंग आहे,” अशी भावना उपस्थित सभासद व नागरिकांमधून व्यक्त झाली.

