दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
17/09/22 रोजी कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांच्या हस्ते 74 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला ठिक 7:50 वा ध्वजारोहण संपन्न झाले.
प्रमुख पाहुणे:- स्वतंत्र सेनानी माजी आमदार व सभापती भाई गुरुनाथ रावजी कुरुडे साहेब यांचा पुष्पहार शाल घालून सत्कार व सन्मान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांनी केले.
ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर नर्सेस फार्मासिस्ट व आरोग्य कर्मचारी यांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली.
त्यानिमित्ताने ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांनी ग्रामीण रुग्णालयात उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता तो ठीक 9:30 वा संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांच्या हस्ते उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचारी श्री.विष्णूकुमार केंद्रे ,श्री नरसिंग झोटिंगे,सत्वशीला कांबळे ,नरसाबाई जाकतवाड आदी कर्मचाऱ्यांचा सत्कार करून पुष्पहार घालून सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
तसेच यावेळी उपस्थित ग्रामीण रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी डॉ.रवीकिरण पोरे डॉ.गजानन देशमुख डॉ.महेश पोकले डॉ.संतोष पदमवार डॉ.श्रीकांत मोरे डॉ.गजानन पवार डॉ.अरुणकुमार राठोड डॉ.शाहीन बेगम डॉ.नम्रता ढोणे डॉ.दत्तात्रेय गुडेमेवार डॉ.निकहत फातेमा व ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
