दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
हळदा (सिद्धतीर्थधाम) : येथील नराशाम प्राथमिक शाळेत ७४ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सकाळी ठीक ८ वाजता मुख्याध्यापक राजेश मठमवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
याप्रसंगी राजेश मठमवार यांनी अध्यक्षीय भाषणात असे म्हणाले की, मराठवाडा, तत्कालीन आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाचा काही भाग हैदराबाद संस्थानात सामील होता. त्यावेळी संस्थानात निजामाचे राज्य होते. त्यांचे स्वतंत्रपणे सैन्य होते व चलनही वेगळे होते. मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी हुतात्मा गोविंद पानसरे, स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्राँफ अशा विविध क्रांतिकारकांचे योगदान होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ॲक्शन करून हैदराबाद मुक्तिसंग्राम यशस्वी केले. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटी विरुद्धचा लढा मराठवाड्यातील जनतेने यशस्वी केला. क्रांतिकारकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतिहास घडवा.
यावेळी सहशिक्षक श्री व्हि.डी. पवारे ,श्री पी.जी. भोसले, श्री वाय. एम. नागुशेरे आणि विद्यार्थी उपस्थित होते.
