दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
🔸आदिवासी मुलाला केली होती लाथा-भुक्क्यांनी मारहाण
🔸रुपाली वनकर व विशाल इंगळे यांचे निलंबन
——————————————-
अमरावती :-दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगई येथील आदिवासी विद्यार्थ्यांला दोन दिवसांअगोदर लाथाभुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी अकोट बस डेपो येथील दोन कर्मचारी वाहकांचे वरीष्ठ अधिकारी यांनी निलंबन केल्याची माहिती अकोट बस डेपोचे डीएम सुनिल भालतीळक यांनी माहिती दिली आहे.
सदर प्रकरण असे की,दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगई येथील विद्यार्थी विरेंद्र रवींद्र पवार हा येवदा येथील शाळेत शिक्षण घेतो.नेहमीप्रमाणे सदर विद्यार्थी हा वडनेर गंगई येथून बस क्रमांक एमएच ३०-९६४३ मधून शाळेमध्ये जाण्याकरिता येवदाकडे निघाला.या विध्यार्थ्याची बस प्रवासाची पास संपल्यामुळे या विद्यार्थ्यांने महिला वाहक रुपाली वनकर(वय ३५,रा.हिवरखेड) यांना पाचशे रुपयांची नोट दिली.आदिवासी विध्यार्थ्याने महिला वाहकाला पाचशे रुपयांची नोट दिल्यामुळे महिला वाहक विध्यार्थ्यावर संतापल्या व दोघांमद्धे बाचाबाची झाली.आदिवासी विद्यार्थ्यांला शाळेमध्ये जाण्याकरिता येवदा येथे उतरायचे होते;मात्र महिला वाहकाने यांनी आदिवासी विद्यार्थ्यांला दर्यापूर बस डेपो येथे घेऊन आले.सुटे पैसे नसल्यामुळे एमएच ३०-९६४३ क्रमांकाची बस चालक डांगे व त्यावर कार्यरत महिला रुपाली वनकर वाहक यांनी दर्यापूर बस स्थानक येथे घेऊन आले.दर्यापूर बस डेपोला आल्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांने बसचा फोटो काढला असता कार्यरत वाहक महिला विद्यार्थ्यावर संतापल्या व विद्यार्थ्याला दर्यापूर बस स्थानक चौकशी कक्षात घेऊन गेले.चौकशी कक्षात घेऊन गेले असता महिला वाहक रुपाली वनकर व तेथे उपस्थित पुरुष वाहक विशाल इंगळे(वय ३०,रा.शेगाव) यांनी त्या विद्यार्थ्याला लाथाभुक्क्यांनी मारहाण केली व सदर प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.याप्रकरणी दोन्ही कर्मचारी वाहक अकोट बस डेपो येथे कार्यरत होते असे समजले.या घडलेल्या विषया संदर्भात विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी अकोट बस डेपोला तक्रार दाखल केली आणि त्यावर वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करून रुपाली वनकर व विशाल इंगळे या दोन्ही दोषी कर्मचारी वाहकांना निलंबित केल्याची माहिती दिनांक १७ सप्टेंबर २०२२ शनिवारला अकोट बस डेपोचे डीएम सुनिल भालतीळक यांनी माहिती दिली.
