दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी जिल्ह्यातील विविध रेल्वे स्थानकातील प्रलंबित विकासकामे जलदगतीने कार्यान्वित करावीत, सचखंड, नंदीग्राम व देवगिरी या लांब पल्ल्याच्या गाड्या एक नंबर फलाटावर न थांबवता कधी दोन तर कधी तीन नंबरच्या फलाटावर लावल्या जातात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि अपंग अशा प्रवाशांना पूलावरुन चढून पार करणे कठीण व जीवावर बेतणारे ठरले जाते. शिवाय एक नंबर फलाटावरील एक्सेलेटर व तीन वरील लिफ्ट निव्वळ एका कोपऱ्यात आहेत. त्यामुळे तेवढे लांब चालून जाणे प्रवाशांना शक्य होत नाही. खेदाची बाब म्हणजे. ती दोन्ही उद्वाहके नियमित बंदच ठेवली जातात. परिणामी प्रवाशांचा राग अनावर होणे स्वाभाविक आहे. या आणि अशा अनेक मागण्यांच्या अनुषंगाने शिवसेनेकडून आजचे हे तीव्र आंदोलन छेडले गेले होते. आंदोलनाची प्राथमिक झलक म्हणून सचखंड एक्सप्रेस रोखून चक्का जाम करण्याचे ठरले होते. खासदार संजय जाधव यांनी निर्वाणीचा इशारा देऊन रेल प्रशासनाला सूचित केले होते. खा. जाधव यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हजारो शिवसैनिकांनी अख्खे रेल्वे स्थानक खचाखच भरले होते. बंदोबस्तासाठी तगडा फौजफाटा तैनात ठेऊनही हे आंदोलन उग्र स्वरुप घेऊन परिस्थिती चिघळली जाऊन शकते या भितीनेच प्रशासनाने आंदोलन आ आधीच सर्व मागण्या मान्य करुन टाकल्या. त्यामुळे आंदोलन हाताबाहेर जाऊन चिघळली जाणारे वातावरण एकदम शांत झाले.
खासदार संजय जाधव यांनी दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापकांना निवेदन देऊन सूचित केले होते. त्या निवेदनात खा. जाधव यांनी एमआयडीसी अंतर्गत खर्चाने केले जाणारे परभणी व पूर्णा जंक्शन येथील प्रलंबित दोन्ही पूलांची कामे मार्गी लावली जावीत असे नमूद केले होते. त्याशिवाय पूर्णा रेल्वे स्थानकातील रखडलेले ओव्हर ब्रीजचे कामही तात्काळ पूर्णत्वास नेले जावे असे निर्देशीत केले होते. परभणी. रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात उभारलेले भव्य अशा लोखंडी गेटवर “परभणी रेल्वे स्थानक” स्वागत करीत आहे, असे मोठ्या व सुवाच्य अक्षरात लिहिले जावे असेही सांगितले होते. ज्यामुळे रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यातही भर पडली जाईल व स्थानक सुध्दा लांबूनच कोणालाही दिसू शकेल.
खा. जाधव यांनी आपल्या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, रेल्वे स्थानक व परिसरात गर्दुल्ले व सराईत गुन्हेगारांच्या वावर मोठ्या प्रमाणात वाढीस लागल्याने प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली असून सुरक्षा पोलीस बल अधिक प्रमाणात तैनात केले जावे आणि रेल्वे परिसरात अनाधिकृत ॲटो रिक्षा वाहनांची घुसखोरी सुध्दा कमालीची वाढली असून ती तातडीने बंद केली जावी अशी मागणी लावून धरली होती. मागील अनेक वर्षांपासून पासून रेल्वे पार्किंग तळावर उजव्या बाजूला एक मोठा खड्डा आहे. त्यावर अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आलेला दगड अत्यंत धोकादायक असाच आहे. प्रसंगी जीवावर बेतणाराही ठरु शकतो परंतु वर्षानुवर्षे तेथे उघडा असलेला तो खड्डा जाणीवपूर्वक दूर्लक्षित केला जात आहे तो तात्काळ झाकला जाणे महत्वाचे आहे. अनेक फलाटांवर पूर्णपणे शेड टाकले नसल्याने प्रवाशांना पावसाळ्यात अक्षरश: भिजतच सामान, मुले सोबत घेऊन फिरावे लागते. ठिकठिकाणी बसण्यासाठी बनवलेले ओटले शेडमधून पाईपाद्वारे खाली येणारे पाणी त्या ओटल्यांवरच भडाभडा वाहिले जाते. परिणामी बेसावध बसलेल्या प्रवाशांना ठेवलेले सामान व मुलांनाही उचलण्याची घाई करावी लागते. त्यातही सुधारणा होणे गरजेचे आहे.
एकूणच खा. जाधव यांनी पुकारलेला आंदोलनात्मक पवित्रा , जमलेले हजारो शिवसैनिक आणि त्यातून निर्माण होणारी गंभीर व चिंताजनक परिस्थिती अधिकच चिघळली जाईल हे वेळीच ध्यानी घेऊन मागण्या मान्य करण्यातच खरा शहाणपणा आहे, असे दाखवून दिले यातच धन्यता दिसून आली अन्यथा सचखंडचा चक्का जाम करुन शिवसेनेच्या आंदोलनाची खरी झलक काय असते हे दाखवून दिली असती परंतु वेळीच मागण्या मान्य केल्यामुळे खा. जाधव यांनीही शिवसैनिकांना काहीच न करण्याचे आदेश दिले त्यामुळे रौद्र रुप धारण करणारे शिवसेनेचे आंदोलन क्षणार्धात शांत झाले हेही नसे थोडके थोडके, असे म्हटले तर मुळीच वावगे ठरु नये.
