दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
आर्णी तालुक्यातील असलेल्या दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मौजा माळेगांव गावातील बिट वनरक्षकांची निवासस्थाने वनविभागाच्या दुर्लक्षितपणामुळे मागील अनेक वर्षापासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेली आहे,बिट वनरक्षकाचे या निवासस्थानात निवास नसल्यामुळे निवासस्थान परिसरामध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असुन,गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत,निवासस्थान समोरच्या मोकळ्या जागेवर लगतच्या नागरिकांनी उकीरडे टाकण्यात आलेले आहे,काही नागरिकाकडून या निवासस्थानाला आपल्या गाय म्हशी बांधण्याचा गोठा करून ठेवलेला आहेत,काही लोकांनी तर या जागेवर आपले संडास व बाथरूम बांधून निवासस्थानाची जागा आपल्या वापरात घेतलेली आहे,मागील अनेक वर्षापासून माळेगांव येथे असलेले बिट वनरक्षकांचे निवासस्थान आज रोजी जीर्ण अवस्थेत असुन,वनविभागाच्या देखभाल दुरुस्ती अभावी ती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही,वनविभागाचे बहुतांश अधिकारी व कर्मचारी तालुका व जिल्हा मुख्यालयातून ये-जा करीत असतात या निवासस्थानांची अजूनही दुरुस्ती करण्यात आलेली नाही,शासनाच्या वतीने लाखो रुपयांचा खर्च करून कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानी उपलब्ध करून दिली जातात परंतु त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याचे अल्पावधीतच दुरवस्था होते, वनविभागाकडून या बिट वनरक्षकाच्या निवासनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे वनाचे संरक्षण कसे होणार असा प्रश्न नागरिक करीत आहे,वनकर्मचारी मुख्यालयी राहून सेवा बजावण्यासाठी निवासस्थाने बांधली आहेत,
